इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. ०८/०२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १९ शके १९४५
दिनांक :- ०८/०२/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२५,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ११:१८,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २६:१४,
योग :- सिद्धि समाप्ति २३:०९,
करण :- विष्टि समाप्ति २१:४३,
चंद्र राशि :- धनु,(१०:०४नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- मकर – धनिष्ठा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०९ ते ०३:३४ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:०२ ते ०८:२७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:०९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:३४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५९ ते ०६:२५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शिवरात्री, भद्रा ११:१८ नं. २१:४३ प., चतुर्दशी श्राद्ध,
————–

: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १९ शके १९४५
दिनांक = ०८/०२/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
कौटुंबिक सौख्य जपावे. उगाचच चीड-चीड करू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. गुरु कृपेचा लाभ होईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील.

वृषभ
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास संभवतात. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. कला जोपासायला वेळ द्यावा. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो.

मिथुन
खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.

कर्क
मुलांशी मतभेद संभवतात. वात-विकाराचा त्रास जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांचे मत समजून घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल.

सिंह
घरातील शांतता जपावी. कर्ज प्रकरणे पुढे ढकला. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. मुलांची प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

कन्या
जवळचे मित्र भेटतील. लहान प्रवास घडेल. कामाला अधिक हुरूप येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. बौद्धिक दिमाख दाखवाल.

तूळ
वाहन चालवताना काळजी घ्यावी. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आवडी-निवडी बाबत जागरूक राहाल. बोलतांना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक खर्च वाढेल.

वृश्चिक
रागाचा पारा चढू देवू नका. आततायीपणा करू नये. इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. योग्य तारतम्यता बाळगावी. घरात मानाने राहाल.

धनू
मानसिक चंचलता जाणवेल. घरातील जबाबदारी उचलाल. गोड बोलून कार्यभाग साधावा. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घशाचा त्रास संभवतो.

मकर
स्वत:चे स्वत्व राखून वागाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. कणखरपणा ठेवावा. मित्रांशी वाद संभवतात.

कुंभ
इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. सर्वांशी हसून-खेळून वागाल. छंदाला अधिक वेळ द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. व्यावसायिक बदल कराल.

मीन
वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सामाजिक बाबीत पुढाकार घ्याल. मुलांची प्रगती दिसून येईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button