पिंपळदरीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले कोडिंगचे प्रात्यक्षिक…

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहमदनगर व कोड टू एन्हांस लर्निंग संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कोड ऑन व्हील्स या दोन दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी कोडिंगचे प्रात्यक्षिके केली.
तंत्रज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आकर्षक, परवडणारे आणि आत्मविश्वास निर्माण करणारे कोडिंग प्रोग्राम करायला देतो. अप्रत्यक्षपणे, आम्ही विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये निर्माण करण्याच्या प्रवासात माहितीपूर्ण आणि जागरूक पालक आणि समुदाय तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ग्रामीण आणि निमशहरी भागातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 6 आणि 7 व्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत घेण्यात येत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 मध्ये इयत्ता 6 वी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना कोडिंग, सर्जनशीलता, क्रिटिकल थिंकिंग आणि इतर 21 व्या शतकातील कौशल्ये शिकवण्याची सूचना केली आहे. मात्र, पायाभूत सुविधा आणि कुशल सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना ही कौशल्ये उपलब्ध होत नाहीत. कोड ऑन व्हील्स हा 2 दिवसांचा इमर्सिव कोडिंग प्रोग्राम आहे. मोबाइल संगणक विज्ञान प्रयोगशाळासह ग्रामीण भागातील जि. प. प्रा. शाळा पिंपळदरी येथे दोन दिवस कार्यक्रम घेतला. विद्यार्थी स्क्रैच, ब्लॉक-आधारित कोडिंग प्लॅटफॉर्म आणि अनुक्रम, इव्हेंट इत्यादीसारख्या संगणकीय संकल्पनांवर कोडिंग करण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी, समारोप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सरपंच, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक सरकारी अधिकारी सहभागी झाले होते.
त्या कार्यक्रमात मुलांनी बनवलेले प्रकल्प व त्यांचे लर्निंग सादर केले गेले. संगणक विज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत संगणक विज्ञान आणि 21 व्या शतकातील कौशल्ये आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आमंत्रित केले गेले.
तालुक्यापासून आमचे गाव 40 किलोमीटर दूर आहे पावसाळ्यात तर सोडाच पण पुन्हा उन्हाळ्यात सुद्धा आमच्या गावात पोहोचण्यासाठी वाहने नाहीत, रस्ते सुद्धा चांगले नाहीत, आजून ही आमच्या गावात बस सेवा नाही तसेच आम्ही सुद्धा शाळेत तीन तीन किलोमीटरवरून पायी शाळेत चालत येतो. या अगोदर आम्ही कधीही स्वतः लॅपटॉपला हात लावलेला नाही मी आज या दोन दिवसाच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. आम्हाला खूप आनंद झाला आम्ही स्वतः लॅपटॉप चालून पाहिला त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकल्प घेतले व एक वेगळा प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला आम्हला खूप मज्जा आली आनंद वाटला आणि आम्ही खूप यातून शिकलो. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना शिक्षकांनी प्रतिक्रिया दिली जर आमच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप न देता विचारला असते की तुम्हाला लॅपटॉप चालवता येईल का? तर विद्यार्थ्यांची उत्तरे नक्कीच नाही अशी आली असती परंतु या संस्थेने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापरण्यास दिले त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आणि त्यातून विद्यार्थी खरोखर आनंदाने लॅपटॉप वापरू शकले आणि त्यांनी उत्तम असे प्रकल्प तयार केले
यावरूनच त्यांचा उत्साह आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय त्याबद्दल कोड टू इनहान्स लर्निंग संस्थेचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया शिक्षक राजेंद्र फटांगर यांनी व्यक्त केली. हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे संस्थापक इरफान ललाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा राबविल्या जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित दत्तात्रय फफाळे साहेब, दशरथ रंधे, ज्येष्ठ नागरिक नामदेव भोजने, श्री. धिंदळे चंदर भाऊ, श्रीम. देशमुख मनिषा रमेश, श्री. बांडे भागवत नाथू, श्री केंगार नितिन दादासाहेब, श्री. फटांगर राजेंद्र काशिनाथ, श्री. भांगरे बाळू विठ्ठल आधी शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. संस्थेचे प्रतिनिधी मार्गदर्शक नानासाहेब पवार व वाहन चालक श्री. रमेश बनसोडे साहाय्य करत कार्यशाळा उत्कृष्टरित्या पार पडली.