अकोले तालुक्यात अवैद्य दारू धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे…

अकोले प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार विभागाने हॉटेल सह्याद्री इंदोरी फाटा ता अकोले. हॉटेल स्नेहभोजन विरगाव फाटा ता अकोले व शाहूनगर अकोले येथे दारू बंदी गुन्ह्याचे छापे मारून 192.24 ब ली अवैद्य देशी दारू 3.24 अवैद्य विदेशीदारू असा एकूण 77 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मध्ये 1)राजू बबन शिंदे राहणार शाहूनगर ता. अकोले 2) विकी ज्ञानदेव राहणे तालुका अकोले 3) भाऊसाहेब बालाजी शिंदे रा. हिवरगाव पावसा तालुका संगमनेर या इसमांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे
. श्री अनिल चासकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे. विभाग पुणे. गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली. श्री संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव, श्री आर डी वाजे राज्य उत्पादन शुल्क संगमनेर श्री अर्जुन पवार राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव, श्री संजय बोधे दुय्यम निरीक्षक विभागीय भरारी पथक पुणे, श्री एस एस ठेगडे दुय्यम निरीक्षक रा उ शु नारायणगाव -1 श्री व्ही जी सूर्यवंशी, श्री एम डी कोंडे श्री डी वाय गोलेकर, यांनी केले
सदर कारवाई त दुय्यम निरीक्षक सर्व श्री एम आर वाघ, बी ई भोर, दिगंबर दुबे व जवान सर्व श्री सचिन गुंजाळ, दाते,सुर्वे, कदम,कांबळे,पोंदे, महिला जवान श्रीमती व्ही एस जाधव एस आर वराट वाहन चालक सुशांत कासोळे कधी पाडोळे इ.सहभागी झाले होते.