राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम : सुजित झावरे पाटील

वासुंदे येथे हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे येथे हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थान समवेत वासुंदे गावातून शुभारंभ करण्यात आला.
आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्या प्रति असलेला सन्मान, राष्ट्रीयत्वाची भावना आणि बंधुभाव वाढावा व स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा संघर्ष आजच्या पिढ्यांना अवगत व्हावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. असे मत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे पारनेर तालुक्यातील नेते सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले की राष्ट्रहित जपण्यासाठी आपण सर्वांनी अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे करणे गरजेचे आहे सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा व आपल्या देशाची एकात्मता राष्ट्रीय भावना व देशाप्रती आदरयुक्त जपवणूक करावी.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे. नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे यासाठी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी व्हा असेही आवाहन झावरे यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे अभियान येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. आपण सर्व या अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव करण्यात येणार आहे यानिमित्त पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे ग्रामस्थांना सुजित झावरे पाटील यांनी राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात केले.
यावेळी वासुंदे गावचे सरपंच सुमनताई सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे सचिन सैद, पो. मा. झावरे सोसायटीचे संचालक बाळासाहेब झावरे, धोंडीभाऊ मधे, सोन्याबापु बर्वे, लहानू झावरे, लक्ष्मण झावरे, चेअरमन दिलीपराव पाटोळे, सगाजी दाते सर, ग्रामपंचायत सदस्य विलास साठे, बाळासाहेब शिंदे, खंडू टोपले, इंजि. प्रसाद झावरे इंजि. निखिल दाते दत्तात्रय बर्वे अशोक झावरे राजेश साठे,आदी ग्रामस्थ वासुंदे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारने हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण भारतामध्ये यशस्वी करण्यासाठी गाव खेड्यापासून या मोहिमेसाठी प्रयत्न सुरू केले आहे. आम्ही आमच्या वासुंदे गावातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असून गावातील प्रत्येक घरावर राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने तिरंगा झेंडा फडकवणार आहे.
शंकर बर्वे
( उपसरपंच, ग्रामपंचायत वासुंदे )