इतर
अकोल्यात एसटी बस सेवा सुरू, ग्राहक पंचा यत च्या लढ्याला यश – मंडलिक

अकोले/प्रतिनिधी
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीत एसटी महामंडळाच्या सर्वच बसेस बंद होत्या. त्यामुळे नागरिक, ग्रामस्थ, व विद्यार्थी, वर्गाचे मोठे प्रवाशांचे हाल झाले. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले. एस.टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांनी कार्यवाही व अंमलबजावणी केराची टोपविली दाखवली.
मात्र याबाबत अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र सातत्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्याकडे 2/2/2022 रोजी पाठपुरावा केला. त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन अहमदनगर यांना 30/6/2022 रोजी आदेश दिला (संदर्भ क्रमांक राप/वाह/चालन 1694, दि. 30/ 6/2022 नुसार आदिवासी अकोले तालुक्यामध्ये एसटी बसेस चालू करा व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार राप. अकोले आगारातून आगारामार्फत अकोले—गणोरे, अकोले—निळवंडे, अकोले– कोतुळ, अकोले— देवगाव, अकोले —चास, अकोले–देवगाव –राजूर, अकोले –राजूर–पाचनई, अकोले– शिरपुंजे–अंबित, अकोेले– साम्रद, अकोले–राजूर– रतनवाडी ह्या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. ह्या बस सुरु झाल्यामुळे प्रवाशांनी ग्राहक पंचायतचे अभिनंदन केले.
तसेच आदिवासी भागातील समशेरपुर, कोतुळ ,भंडारदारा, ब्राह्मणवाडा,राजूर,गणोरे या मुख्य बाजारपेठांच्या गावांना एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.