अहमदनगर

राळेगणसिद्धी, हिवरे बाजार गावांनी देशाला जलसंवर्धनाची दिशा दिली~ शरद पवळे

दत्ता ठुबे
पारनेर;-जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे,पद्मश्री पोपटराव पवार यांनी लोकसहभाग श्रमदानातून गावात जलसंवर्धनासह ग्रामविकासाचे राबवलेले उपक्रम आज त्या गावांपुरते मर्यादित राहीलेले नाहीत त्यांची व्यापकता दिवसेंदिवस वाढत आहे भुगर्भातील पाण्याच्या खालावत चाललेल्या पातळीच संवर्धन करण्यासाठी पुरातन जलस्रोत,पाझर तलावांच्या दर्जेदार कामांसह दुरुस्ती करून समृद्ध, सक्षम जलयुक्त गाव उभी कण्यासाठी लोकसहभाग श्रमदानातून उभी झालेली राळेगणसिद्धी,हिवरे बाजार गाव आपली आधुनिक ग्रामविकासाची तिर्थक्षेत्र,पर्यटनस्थळ आहेत हिवरे बाजार येथे आदर्श गावचे सरपंच पोपटरावजी पवार यांच्या संकल्पनेतून राबलेल्या सुवर्णमहोत्सवी श्रमदान आभियानाच्या माध्यमातून पाझर तलावाची गळती थांबवण्यासाठी ग्रामस्थांसह, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आशिष येरेकर, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद पांडूरंग गायमुद्रे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपअभियंता डी.के.ठुबे, वनपरीक्षेत्र आधिकारी सुरेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले आदींनी श्रमदान करत महाश्रमदान अभियानाला ऊर्जा दिली या उपक्रमात सहभागी झाल्याचे मोठे समाधान होत असून भविष्यात अशा प्रकारच्या कामांची व्यापकता वाढवण्यासाठी जल संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्यासाठी निश्चित पुढाकार घेवू असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button