पारनेर तालुक्यात आदिवासी महिलेवर कोयत्याने वार .

कमी किमतीत मासे दिले नाही
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील रामभाऊ गागरे या ईसमाने संगिता बाळु पवार हे मासे विक्री करत असताना त्यांना मासे कमी किमतीत न दिल्याचे कारण काढुन सदर रामभाऊ गागरे इसमाने त्या स्त्रिला कोयत्याने मारहान केलेली आहे इसमाविरुध्द रितसर पारनेर पोलिसात तक्रार दाखल सदर इसमास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शबरी माता भिल्ल, आदीवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे पारनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक घनश्याम बलप यांना निवेदन देण्यात आले सदर आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी शबरी माता भिल्ल, आदीवासी विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आली यावेळी दीपक बर्डे अध्यक्ष शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य, मोहन माळी अध्यक्ष पुणे जिल्हा, भिमाजी भांगरे, विकास बर्डे, अनिल पवार, पांडुरंग पवार, शांताराम गायकवाड, अरुण बर्डे, यांच्यासह शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संस्था संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर महिला संगिता बाळु पवार हीस घटना घडल्या नंतर टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे सदर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर चे पोलीस करत आहेत.