आजचे पंचांग व राशिभविष्य दि ९/०८/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १८ शके १९४४
दिनांक :- ०९/०८/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५९,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १७:४७,
नक्षत्र :- मूळ समाप्ति १४:३७,
योग :- विष्कंभ समाप्ति २३:३५,
करण :- बव समाप्ति ०७:२६, कौलव २८:०३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४७ ते ०५:२३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४७ ते ०५:२३ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भौमप्रदोष, मोहरम, शाकदान-दधिव्रत, अगस्ति दर्शन, घबाड १२:१८ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १८ शके १९४४
दिनांक = ०९/०८/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
विवाह बोलणी लांबणीवर पडू शकतात. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. अनोळखी व्यक्ती मदत करतील. मेहनतीला पर्याय नाही. विरोधक नामोहरम होतील.
वृषभ
विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील. उगाच तर्क-वितर्क करत बसू नका.
मिथुन
आंधळा विश्वास ठेऊ नका. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. गोडी-गुलाबीचे धोरण ठेवावे.
कर्क
आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका. मन विचलीत होऊ शकते. जुनी कामे आधी हातावेगळी करावीत.
सिंह
चर्चेतून मार्ग काढावा. गुंत्यातून बाहेर पडाल. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कन्या
भडक मार्गाचा अवलंब करू नका. मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
तूळ
काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. समस्यांचे निराकरण होईल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
वृश्चिक
जुने गैरसमज दूर होतील. अवाजवी खर्च टाळावा. दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल. पित्त विकारात वाढ होऊ शकते.
धनू
उपासनेत मन रमवावे. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते. सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल.
मकर
घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत. नियोजित कामे पार पडतील. वैचारिक स्थैर्य जपावे.
कुंभ
वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील. जवळच्या मित्रांशी वाद घालू नका. चैनीत दिवस घालवाल.
मीन
आरोग्यात सुधारणा होईल. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर