उरण येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा!

(हेमंत सुरेश देशमुख)
आज मंगळवारी दिनांक 9/8/2022 रोजी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात करत क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले
देशाच्या स्वातंत्र्या साठी बलिदान केलेल्या, खडतर तुरुंगवास भोगलेल्या आणि अन्यप्रकारे हालअपेष्टा सोसणाऱ्या क्रांतिवीरानां विनम्र अभिवादन करण्यासाठी आज उरण येथील समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार कांतिलाल कडू, उरण सामजिक संस्था चे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस ज्येष्ठ समाजसेवक संतोष पवार साहेब तसेच प्राचार्य मढवी साहेब, जे एन पी टी विश्वस्त कामगार नेते भूषण पाटील, उरणचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार, तसेच गोपाळ पाटील, सिमा घरत, दिनेश घरत, इत्यादी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते