भाळवणी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यां वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवविणार -अविनाश पवार .

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शाळेत ४५८ आदिवासी विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी शिक्षणापासुन वंचित राहू देणार नाही असे अविनाश पवार यांनी सांगितले.
आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि शिक्षणविभागाच्या भोंगळ कारभारामुळे आयझॅक इंग्लिश मिडीयम स्कुल भाळवणी येथील ४५८आदिवासी विद्यार्थी मुले, मुली शिक्षणापासुन वंचित असल्याचे मनसे नेते अविनाश दादा जाधव यांची पालकांनी भेट घेऊन निदर्शनास आणून दिले. भाळवणी येथील आयझॅक इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेस पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी अचानक भेट दिली असता ४५८ विद्यार्थी शाळेपासुन व शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती शिक्षकांकडुन कळताच पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी आयझॅक इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्रिन्सिपल व संस्था चालक यांना याबद्दल विचारले असता ही माहिती खरी आहे सांगितले.अधिक चौकशी केली असता स्थानिक राजकारणामुळे आमच्या संस्थे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली व आमची मान्यता रद्द करण्यात आली असे संस्था चालक यांनी सांगितले. आदिवासी भागातील गरिब विद्यार्थी मुले मुली ही घरी असुन शिक्षणापासुन वंचित असल्याचे समजले.ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर ह्या गोष्टी चा जाहिर निषेध करत आहे .गरिब, अशिक्षीत आदिवासी विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय त्वरित गांभीर्याने चौकशी करून गट शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन हे विद्यार्थी आठ दिवसांत शाळेत दाखल करा व हा काय प्रकार आहे तो स्पष्ट करा नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर आदिवासी विद्यार्थाच्या शाळेसाठी व हक्कासाठी या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल व यास सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार राहिल असे निवेदन देऊन नमुद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने पारनेर गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले व तालुका उपाध्यक्ष अविनाश दादा पवार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
