मेट्रो सिटी न्यूज

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या आमरण उपोषणाला यश


पुणे दि 9
दि 8 /8/2022 पुणे कामगार उपआयुक्त कार्यालय वाकडेवाडी,शिवाजीनगर येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) आमरण उपोषण करण्यात आले

पुणे झोन मधील पिंपरी विभागातील माहे नोव्हेंबर 2021 मधील 5 कंत्राटी कामगारांचा,कोथरूड विभाग व पिंपरी विभागातील माहे जुलै 2021 ते माहे डिसेंबर 2021 या सहा महिन्यांचा महागाई भत्ता तसेच पुणे ग्रामीण मधील मुळशी विभागाचा माहे मे 2022 चा पूर्ण पगार,माहे जून 2022 मधील 17 कंत्राटी कामगारांचा पगार थकीत होता त्यासोबत संघटनेची महत्वपूर्ण मागणी होती की पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी,पनवेल वाशी,पुणे आणि आता कोल्हापूर येथे मे ऑल ग्लोबल सर्व्हिसेस प्रा ली या ठेकेदाराने धुमाकूळ घातलेला आहे , कामगारांना वेतन न देणे , पगारतुन पैशाची मागणी करणे, ई त्या भ्रष्ट कंत्राटदाराचे लायसन्स जप्त करावे व त्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे या सर्व महत्वपूर्ण मागण्या घेऊन संघटनेने हे बेमुदत आमरण उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून कामगार उपआयुक्त कार्यालय,वाकडेवाडी,शिवाजी नगर येथे चालू केले हे आंदोलन चालू झाल्यानंतर पुणे झोन मधील सर्व कामगारांचे थकीत वेतन व थकीत महागाई भत्ता आज कामगारांच्या खात्यावर जमा झाला दुपारनंतर अपर कामगार आयुक्त श्री अभय गीते यांनी चर्चेला संघटनेला बोलविले. संघटनेने त्या मीटिंग मध्ये आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण पुणे येथे कंत्राट घेवून कामगारांचे पैसे लुबाडनाऱ्या दोषी ऑल ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदारांवर त्वरित खटला दाखल करा त्याचे लायसन रद्द करा याच कंत्राटदारांने सध्या कोल्हापूर मधील कंत्राटी कामगारांवर देखील अन्याय सुरू केला आहे याचे लायसन रद्द केल्याशिवाय हे बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सांगितल्यावर त्यांनी या सर्व गोष्टींची तातडीने दखल घेत कामगार उपायुक्त कार्यालय ने खटले भरण्याची व ऑल ग्लोबल सर्व्हिस या एजेन्सीचे लायसन्स रद्द करण्याबाबतच्या कार्यवाही सुरू केल्या आहेत असे सांगितले तसे लेखी मिनिट्सही कामगार कार्यालयातून संघटनेला देतो असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आणि तसे लेखी मिनिट्सही त्यांनी संघटनेला दिले व आमरण उपोषण मागे घ्यावे असे आव्हान त्यांनी केल्यामुळे आजचे यशस्वी आमरण उपोषण भारतीय मजदूर संघ व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या उपस्थित मागे घेण्यात आले . या वेळी झालेल्या सभेत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी वीज क्षेत्रातील, ईतर क्षेत्रातील कंत्राटदारांनी कामगारांना त्रास, मानसिक, आर्थिक लुटमार करू नये अन्यथा महाराष्ट्रातील सर्व लेबर आॅफीस समोर कंत्राटी कामगारांचे लढे पुकारणार असुन या संघर्षात सर्व कंत्राटी कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून ऐका ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हावे असे आवहान केले आहे
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात यांनी शासनाने दखल घेऊन सर्व कंत्राट दार मुक्त करण्यासाठी कंत्राटी कामगारांना D B T पध्दतीने कामगारांना वेतन दिले पाहिजे. व शास्वत रोजगार द्यावा. या करिता लवकरच मा मुख्यमंत्री, व मा उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे असे सांगितले आहे

आजच्या या यशस्वी आंदोलनाला भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.अर्जुनजी चव्हाण यांनी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे ह संघटन मंत्री श्री राहुल बोडके यांना प्रातिनिधिक स्वरूपात ज्युस देवुन उपोषण ची सांगता केली. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे( संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रदेश अध्यक्ष .श्री. निलेश खरात, सरचिटणीस .श्री.सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष .श्री उमेश आनेराव, संघटनमंत्री .श्री.राहुल बोडके, कोषाध्यक्ष .श्री.सागर पवार,पुणे झोन अध्यक्ष मा.श्री.सुमित कांबळे,मा.श्री.निखील टेकवडे, व पुणे झोनचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी कोथरुड व मूळशी डिव्हिजन येथील सर्व कामगार सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button