विखेंना मंत्री मंडळात स्थान मिळाल्याने लोणीत जल्लोष!

लोणी- राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात लोणी गावचे सुपूत्र व माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागल्याने लोणी गावात जल्लोष साजरा केला
ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंद साजरा केला.
आज सकाळी ११ वा. मुंबईत शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर आ.विखे पाटील यांना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह जिल्ह्याला होती. शपथविधी सोहळा सुरु झाल्यानंतर प्रथम क्रमांकांवरच आ.विखे पाटील यांना शपथ घेण्याची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष अधिकच व्दिगुणीत झाला. लोणी बुद्रूक या त्यांच्या गावी सर्व जेष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यास माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले.
याप्रसंगी सरपंच कल्पना मैड, एम.वाय. विखे, रंगनाथ विखे, कचरु विखे, किसनराव विखे, अशोक धावणे, लक्ष्मण विखे, दादासाहेब म्हस्के, दिलीप विखे, गोरक्ष दिवटे, प्रविण विखे, नवनीत साबळे, संजय लगड, परशुराम विखे, जालींदर विखे, प्रभाकर विखे यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला
