इतर

आदिवासींच्या संस्कृती, चालीरीतींचे जतन व्हावे आ. नीलेश लंके

पारनेर प्रतिनिधी:-

 आदिवासी संस्कृती ही पर्यावरणवादी, पर्यावरण पुजक आहे. या संस्कृतीचे, चालीरीतींचे जतन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मतदारसंघातील आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.
    जागतिक आदिवासी दिनानिमित्त पळशी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. लंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, गणेश हाके, राजू पवार, पोपट गांगुर्डे, सोमनाथ मधे, पळशीचे सरपंच गणेश झुंबर मधे आदी उपस्थित होते.  
    यावेळी बोलताना लंके म्हणाले, एकलव्य काळापासून आदिवासी समाजावर अन्याय होतो आहे. डोंगर, दऱ्यात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा, ज्या जीवाने पहिला जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. एकदा दिलेला शब्द न बदलणारा म्हणजेच  आदिवासी. प्रामाणिकपणे वागणारे आदिवासी शिवरायांचेही मावळे होते. या भागात आदिवासींच्या घरकुलांचा प्रश्‍न आहे. तो लवकरच मार्गी लावण्यात येईल. इतर कोणतेही प्रश्‍न असतील तर माझ्याजवळ मांडा तुमचा भाऊ म्हणून मी हे सर्व प्रश्‍न मार्गी लावेल.     
     कोणत्याही क्षेत्रात आदिवासी बांधव मागे राहता कामा नयेत यासाठी शासनाच्या सर्व योजना परिणामकारक रित्या राबविण्यात येतील. आपल्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत. एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसत असताना आपण मागे का असा सवाल करून आपणास सर्व क्षेत्रात आता भरारी घ्यायची आहे. एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.
   नागापूरवाडी, माळवाडी, मेनडोह, रानमळा, महारकार वस्ती, चिकणे वस्ती, जांभळवाडी, बोरवाक, शिक्री, मांडओहळ, काळुची ठाकरवाडी, कळवतणीचा दरा, पुणोबाची वाडी, वावरथ, भोकरदरा, मधे वस्ती, मनई वस्ती, कौठेमलकापूर, ताहराबाद, चिंचाळे, वनकुटे, तास, पळशी गावठाण येथील स्वयंसेवक प्रतिनिधी, बाळकृष्ण गांडाळ, निवृत्ती गि-हे, संजय केदार, जयराम मधे, भागा काळे, उत्तम पवार, संजय मेंगाळ, दिलीप जाधव, भिमा उघडे, लहू मधे, नामदेव जाधव, एकनाथ चिकणे, कैलास चिकणे, राजाराम मेंगाळ आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button