श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान विश्वस्त पदांकरिता २७६ इच्छुकांचे अर्ज

पाथर्डी / प्रतिनिधी
राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट च्या विश्वस्त पदासाठी तब्बल 276 इच्छुकांनी अर्ज केले आहेत
श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट श्रीक्षेत्र मोहटादेवी न्यासाच्या दहा विश्वस्त पदांकरिता २७६ इच्छुकांचे अर्ज
देवस्थान समितीला प्राप्त झाले आहेत.
प्राप्त अर्जदारांची यादी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या सुचनेनुसार देवस्थानच्या
संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे ती देवस्थानच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मोहटादेवी देवस्थान समितीच्या पुढील
तीन वर्षांसाठी नवीन विश्वस्त मंडळ निवडीसाठी इच्छुकांकडून ३० ऑगस्ट २०२२ रोजी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची अखेरची मुदत १० सप्टेंबर २०२२ होती. या कालावधीत मोहटे गावातील पाच विश्वस्त पदांकरिता व राज्यभरातील मोहटादेवी भक्तांमधून पाच जागांसाठी १८७ अर्ज मुदतीमध्ये प्राप्त झालेले आहेत. प्राप्त अर्जदारांची यादी देवस्थानच्या सूचना फलक तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध
केलेली आहे. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ २४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नवीन मंडळाची निवड करण्यात येणार आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढल्याने आता या देवस्थान वर कोणाची वर्णी लागते या कडे लक्ष लागले आहे