.नित्यनेमाने ‘अग्निहोत्र’ केल्याने जीवनात बदल – सृष्टी डांगरे

सोलापूर- सध्याच्या धगधगत्या जीवनात प्रत्येकाचे जीवनशैली बदलत आहे. यामुळे मानसिक, शारीरिक आरोग्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. नित्यनेमाने ‘अग्निहोत्र’ केल्याने शारीरीक आरोग्य सुधारण्यासाठी मदतच होईल. याबरोबर मानसिक व चांगल्या विचारांमुळेच जीवनात बदल घडण्यास मदत मिळते. म्हणून दररोज ‘अग्निहोत्र’ करावेत, असे आवाहन सोलापूरातील ‘अग्निहोत्राच्या अभ्यासिका’ सृष्टी डांगरे यांनी केल्या.
सोलापूरात पद्मशाली सखी संघम व श्री तोगटवीर समाज महिला मंडळाच्या वतीने कन्ना चौकातील चौडेश्वरी मंदिरात महिलांसाठी आयोजित केलेल्या अग्निहोत्र प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, तोगटवीर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा उमा पुडूर, दै. सकाळच्या महिला पत्रकार प्रमिला चोरगी, ममता तलकोकूल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या, दररोज संध्याकाळच्या वेळेला अग्निहोत्र करा. याने मानसिक स्वास्थ्य, समाधान आनंद मिळतो. याचबरोबर येणा-या संकटांना शांतपणे मात करता येतो. ‘अग्निहोत्र’ करण्यासाठी पाचच मिनिटांचा वेळ, कमी खर्च आणि दुप्पट फायदा मिळतात. असे म्हटल्या. तसेच ‘अग्निहोत्र’ करण्यासाठी अग्निहोत्र पात्र, गायीच्या गव-या, गायीचा तूप, तांदूळ, कापूरवडी या साहित्याची आवश्यकता असते. सृष्टी डांगरे यांनी स्वतःसह उपस्थितांना शास्त्रोक्त पध्दतीने अग्निहोत्र प्रात्यक्षिकांसह करण्यास भाग पाडले, मार्गदर्शनही केल्या. यावेळी उपस्थितीतांनी केलेल्या शंकाचे निरसन डांगरे यांनी केल्या. जवळपास पन्नास महिलांनी सहभाग घेतला. सरस्वती सोमनाथ, सुजाता मंगलपल्ली, कांतायनी पुरुड, सुनिता बडगंची, उमा बद्दल यांची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळाले. कांता पुरुड या प्रास्ताविक करत सूत्रसंचालन केल्या, शेवटी आभार ममता मुदगुंडी यांनी मानल्या.
फोटो ओळ : पद्मशाली सखी संघम व श्री तोगटवीर समाज महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या अग्निहोत्र प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित महिला.