पारनेर येथे न्यू आर्ट्स,कॉमर्स & सायन्स कॉलेज,मध्ये आजादी का अमृत महोस्तव
पारनेर प्रतिनिधी
:-अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स,कॉमर्स & सायन्स कॉलेज,पारनेर यांनी
एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्स आजादीचा अमृत महोस्तव हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी रॅलीचे आयोजन केले. हर घर तिरंगा या मोहिमेमागील संकल्पना लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना बिंबवणे आणि लोकसहभागाच्या भावनेने स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव साजरा करणे हा आहे. १७, महाराष्ट्र बटालियनचे एन.सी.सी. अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, सुबेदार मेजर लोकेंदर व आर्मी स्टाप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच न्यू आर्ट्स,कॉमर्स & सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर , उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे , महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट. प्रा. भरत डगळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, शा.शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय गायकवाड, प्रा.सुनील घोलप , एन.एस.एस. विभागाचे प्रमुख संजय आहेर , कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.संजय कोल्हे, प्रा.डॉ. सुधीर वाघ ,प्रा.डॉ. हनुमंत गायकवाड ,प्रा.अशोक मोरे, कार्यालयीन प्रमुख सुनील चव्हाण, श्रीमती दिघे मॅडम , प्रा.राणी शेख उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी मार्गदर्शन करताना भारताच्या राष्ट्रध्वजाचे देशातील लोकांसाठी खूप महत्व असल्याचे सांगितले भारताचा राष्ट्रध्वज शांतता, प्रेम आणि एकतेचे प्रतिक आहे .
भारताला स्वतंत्र मिळविताना अनेक स्वातंत्र सैनिकांनी प्राण गमावले. तिरंगा त्यांच्या अमूल्य बलिदानाचे प्रतिनिधित्व करतो. १५ आँगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत .
या रॅलीसाठी महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्स , महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार नंदकुमार झावरे पाटील, सचिव मा. जे. डी. खानदेशी , मा.पंचायत समिती सभापती मा. राहुल भैय्या झावरे पाटील यांनी एन.सी.सी. कॅडेट्सचे कौतुक केले .