वाघुंडे-भोयरे गांगर्डा सह पारनेर तालुक्यातील सर्वाधिक सेवा सोसायट्यांवर आ.निलेश लंके यांचे वर्चस्व !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
बिनविरोध निवडणुकींचा संकल्प समोर ठेवून गेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पारनेर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायत बिनविरोध करणारे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी येऊ घातलेल्या व नुकत्याच संपन्न झालेल्या तालुक्यातील सेवा सोसायट्यांमध्ये सर्वाधिक गावांमध्ये वर्चस्व सिद्ध करत आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे .नुकत्याच झालेल्या वाघुंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था वाघुंडे पंचवार्षिक
निवडणूक निकाल जाहीर झाला आसुन
वाघुंडे सोसायटी वर आमदार निलेश लंके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे .सर्वच्या सर्व जागेवर आमदार निलेश लंके यांचे सहकारी निवडून आले आहेत . संचालक दिवटे सुदाम नाना, प्रशांत भाऊसाहेब गाडीलकर , सुदाम रघुनाथ रासकर , व्यवहारे भिवशेन बापू, संतोष भिवा झरेकर ,मगर बाळू दगडू,
मगर शत्रुघन दशरथ,संदीप सुकदेव मगर , भास्कर कुंडलीक मगर , आनिल बन्सी रासकर ,
दिवटे ताराबाई बाबासाहेब,मगर कुसुम अशोक,
लोहार प्रमोद विजयकुमार यांचा सत्कार करून आमदार निलेश लंके यांनी सर्व संचालकांन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच सोसायटीच्या इमारतीसाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल असेही सांगितले व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान केला.
त्यांच्या समवेत बापू दिवटे पाटील , चंद्रकांत रासकर ,शरद रासकर , शिवा दिवटे,व्यवहारे सर शिवाजी रासकर विशाल गाडीलकर, नाना मगर, पिनू मगर , वसंत मगर हे ही ऊपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून वाघमोडे साहेब यांनी काम पाहिले . त्याच बरोबर भोयरे गांगर्डा विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत भैरवनाथ जनसेवा सहकार पॅनलने 12 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले .तर विरोधी भैरवनाथ सहकार पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले .

नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत एकूण 456 मतदानापैकी 435 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम सी पालवे तसेच सचिव जासूद यांनी काम पाहिले निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भैरवनाथ जनसेवा सहकारी पॅनलच्या उमेदवारांनी गुलालाची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला
विजयी उमेदवार पवार संजय भाऊ २७० पवार माणिक अण्णा २६३ रसाळ दादासाहेब सिताराम २५६
भोगाडे प्रदीप नामदेव२५१ भोगाडे सागर भाऊसाहेब २५१ रसाळ सचिन न्यानदेव २४८ रसाळ अर्जुन भानुदास २४३ कामठे विजय गुलाब २२०
महिला प्रतिनिधी -रसाळ प्रतिभा शिवाजी२८७
भोगाडे उर्मिला लक्ष्मण२५७ भटके-विमुक्त
घुले लक्ष्मण रामभाऊ२६९ अनुसूचित जाती जमाती सातपुते कमळाबाई सुदाम २६८सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी उपसरपंच मोहन पवार माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे दौलतराव गांगड आदिनाथ गायकवाड सुभाष भोगाडे यांनी परिश्रम घेतले निवडणूक संपली मतभेद संपून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन करण्यात केले .
पारनेर तालुक्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकास पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हतता ठेवून सार्वभौम कार्य करावे असे सूचित केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या .