शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई-शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला ते ५२ वर्षाचे होते. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. . या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आलंय. या अपघातामुळे विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जातेय.*
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता. , आता विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण मराठा समाजाचे लढ्याचे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जाते आहे
अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या कामोठा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्याच्यावर उपचार केले जाणार होते. पण सुरुवातीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक मेटे यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनही याला अधिकृत दुजोरा देण्यात आलं.
विनायक मेटे यांच्या हाताला, पायाला जबर मार लागल्याचं सांगण्यात आलं .
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली इथल्या बातम बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासह असलेले त्यांच्या सहकारीही जबर जखमी झाले होते. तर कारचा चक्काचूर झाला होता. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर लगेचच विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आलं. कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयातील क्रीटीकेअरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला