इतर
भायगाव येथील अशोक लांडे यांचे आपघाती निधन !

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील अशोक जनार्दन लांडे यांचे आपघाती निधन झाले.
मृत्युसमयी ते ३४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी भाऊ, भावजय, दोन पुतण्या असा मोठा परिवार आहे. गंगामाई साखर कारखान्याच्या शेतकी विभागामध्ये ते नोकरी करत होते.
अतिशय मन मिळावू स्वभावाचे अशोक लांडे यांची निधनाची बातमी समजताच भायगाववर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने परिसरातुन हळहळ व्यक्त होत.
त्यांचा अत्यंविधी मजले शहर रोडवरील त्यांच्या राहत्या घराजवळील शेतात सकाळी १० वाजुन ३० मिनिटांनी होणार आहे.