रामदास फुले यांचा नेप्ती ग्रामस्थांनी केला सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)–
निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देत आहेत. मोठ्या तळमळीने समाज कार्यात फुले अग्रेसर असून, त्यांची सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका अध्यक्षपदी झालेली निवड गावाच्या दृष्टीने अभिमानपद आहे. नेप्तीचे नाव रामदास फुले यांच्यामुळे देशभर झाले आहे .असे प्रतिपादन सरपंच संजय जपकर यांनी केले.
सकल माळी समाज ट्रस्टच्या नगर तालुका अध्यक्षपदी नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा वेताळ बाबा मित्र मंडळ , द किंग ग्रुप व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच जपकर बोलत होते. वेताळ बाबा भंडारा उत्सवात झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी सरपंच अंबादास पुंड, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे, बाबासाहेब होळकर, फारुक सय्यद, आ. निलेश लंके प्रतिष्ठानचे तुषार भुजबळ, सौरभ भुजबळ, समता परिषद शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, अनुराग अभय आगरकर, पोलीस पाटील अरुण होले, प्रा. भाऊसाहेब पुंड, बाबूलाल सय्यद, विनायक बेल्हेकर, कुणाल शिंदे, आसाराम पुंड, नितीन शिंदे, सागर शिंदे, राहुल भुजबळ, हरिभाऊ पुंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रामदास फुले म्हणाले की, सामाजिक कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य केले जाणार आहे. सकल माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला संघटित करुन प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.