पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम च्या सरचिटणीसपदी गणेश पेनगोंडा यांची निवड..

.
सोलापूर – पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या सरचिटणीसपदी सोलापूरातील सामाजिक जाणीव असलेल्या गणेश पेनगोंडा यांची २०२२ – २७ या सालाकरिता निवड करण्यात आली आहे.
गणेश पेनगोंडा यांनी यापूर्वी सोलापूरात झालेल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. पेनगोंडा हे पद्मशाली समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होऊन स्वतःला झोकून देतात. यामुळेच पेनगोंडा यांना पद मिळण्यासाठी अखिल भारतीय पद्मशाली संघमचे (हैदराबाद) माजी अध्यक्ष श्रीधर सुंकरवार यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
गणेश पेनगोंडा यांची निवड झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघमचे (हैदराबाद) नवनिर्वाचित अध्यक्ष स्वामी कंदकटला, सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, जनार्दन कारमपुरी, मुरलीधर आरकाल, नरसय्या इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी, पद्मशाली युवक संघटना, शहर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, पद्मशाली पद्मावतीदेवी ब्रम्होत्सवम संस्थेचे पदाधिकारी, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम आणि सर्व मित्र परिवारांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.