युनिटी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
नाशिक – सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युनिटी फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप करण्यात आल्या . या उपक्रमाअंतर्गत शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरित करण्यात आल्या.
क्रिएटिव माइंड स्कूल गांधीनगर येथे शालेय विद्यार्थ्याना वही वाटप करण्यात आले त्या प्रसंगी शाळेच्या मुख्यध्यापक श्रीमती मनिषा मनोज जोंधळे मॅडम तसेच पूजा वानखेडे,आशा दिवे,प्रांजल पगारे,प्रिया नितनवरे राजेश गिरी ,स्वाती जाधव,नेहा पाटील हे शालेय शिक्षक उपस्थित होते
तसेच , अँड.विनया नागरे ,आरती जैन आणि धनश्री गायधाने याची विशेष उपस्थिती होती
या उपक्रमाचे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. एकता कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, “शिक्षण ही मुलांची मूलभूत गरज असून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे हे आपल्या सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश आहे.”
कार्यक्रमात अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. पालक आणि शाळेतील शिक्षकांनी युनिटी फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले.