हनुमान कोळीवाडा गावात JNPT विस्थापितांचे घराघरावर झेंडावंदन !

( हेमंत सुरेश देशमुख)
उरण रायगड
उरण हनुमान कोळीवाडा गावासहित JNPT विस्थापितांनी मूळ शेवा कोळीवाडा गावात दि.१४ ऑगस्ट २०२२ आणि १५ अॉगस्ट २०२२ रोजी घरा घरावर झेंडा वंदन साजरा केले.
शासनाने JNPT विस्थापितांना गेली ३५ वर्ष संक्रमण शिबिरात कोंबून ठेवून वर प्रशासन सतत बनावट दस्तावेज तयार करून करत असलेला मानवी हक्कांचा छळ व मानवी जिवित असहाय्य झाल्याने आणि मा.पालकमंत्री, मा. पुनर्वसन मंत्री मा.उपमुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री, मा. केंद्रीयमंत्री मा. लोकायुक्त यांच्या आदेशाचे प्रशासन पालन करून ३५ वर्षे उलटूनही सन १९८५ साली मंजूर असलेले शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७०मिळून २५६ कुटुंबांचे १७ हेक्टर जमिनीत मंजूर पुनर्वसन करत नसल्याच्या निषेधार्थ JNPT विस्थापितांनी भूमिसंपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र)नियम,२०१४ खंड २३ नुसार शासनाने ज्या कारणासाठी मूळ शेवा कोळीवाडा गावठाण संपादन केलेले आहे. त्या कारणासाठी त्याचा अद्याप ३५ वर्ष वापर झाला नसल्याने मूळ शेवा कोळीवाडा गावात दि.१४ ऑगस्ट २०२२ आणि १५ अॉगस्ट २०२२ रोजी घरा घरावर झेंडा वंदन साजरा केला आहे. आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडून पोलीस सरंक्षण घेऊन मूळ शेवा कोळीवाडा गावठाणात भूखंड वाटप करून सर्व ग्रामस्थ मूळ शेवा कोळीवाडा गावठाणात रहायला जाणार आहोत
