इंदोरीत पंचवीस वर्षानंतर रंगला …जुन्या मित्रांचा… … स्नेह मेळावा.

अकोले प्रतिनिधी
…..तीच शाळा.. तोच वर्ग… ,,,तेच शिक्षक… तेच विद्यार्थी… सुमारे पंचवीस वर्षानंतर प्रवरा विद्यालय इंदोरी ता.अकोले मधिल १९९६ च्या दहावीच्या बॅचचा दिल, दोस्ती, दुनियादारीचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तत्कालीन शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची या माजी विद्यार्थी मेळाव्याने शाळेबद्दल ऋणानुबंध पुन्हा एकदा पक्के झाले.
१९९६ च्या दहावीच्या बॅचचे भाऊराव साबळे, सचिन जोशी, प्रवीण धुमाळ, पल्लवी देशमुख या माजी विद्यार्थ्यांच्या नियोजनातून हि स्नेह भेट घडून आली. सेवा निवृत्त शिक्षक शरद देशमुख, के. के .नवले , जीवन गुंजाळ , संपत लांडगे, प्रकाश खेमनर, श्री गडाख,श्री क्षिरसागर यांना विद्यार्थांनी विनंती करीत स्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण धाडले आणि हे सर्व पाहुणे शिक्षक पुन्हा वर्गात येतात” गुड आफ्टरनून सर” चा आवाज घुमला. आणि मग विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचा आज किती फायदा झाला. या शिक्षेमुळेच आज प्रत्येक जण यशाचे यशस्वी आयुष्य जगत असल्याचा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यांनी सांगितला.
शिक्षकांचा सन्मान, शाळे प्रति कृतज्ञता, गुणवंतांचे कौतुक, शालेय आवारात वृक्षारोपण असे स्नेहबंधाचे अनेक पैलू उलगडल्याने या सोहळ्यात रंगत आली. चाळीशी पार केलेल्या प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनींने शाळा व शिक्षक हेच आमचे दैवत असल्याचे विनम्रतापूर्वक सांगत नतमस्तक होत शिक्षक, मित्र ,मैत्रिणींबरोबर पुन्हा एकदा गप्पांचा फुलोरा फुलवला. मुख्याध्यापक शांताराम मालुंजकर यांनी शाळा काल आज व उद्या यावर मार्गदर्शन केले व शाळेप्रती मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आभार सुखदेव खारके यांनी मांनले .माजी विद्यार्थिनी पल्लवी देशमुख, सुनंदा कानवडे, अर्चना देशमुख, ज्योती मालुंजकर, संगीता कुटे,उषा मोहिते, रोहिणी मालुंजकर, शुभांगी नवले, सुभद्रा गायकवाड, अंजली माळवे,कामिनी राजगुरू,सुविद्या देशमुख, पद्मा आरोटे ,गुलाब पवार, धनंजय हासे, संदीप नवले ,शिवाजी हासे, राजू ठोंबाडे, तुळशीराम नवले, नवनाथ कर्पे, काकासाहेब देशमुख,दशरथ लोहटे, सुभाष धुमाळ, संजय डगळे,दत्ता हासे, रविकांत नवले, दत्ता मालुंजकर, अशोक शिरसाट , अशोक लोहटे, लक्ष्मण नवले, संतोष साळवे,आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.