पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:-
पिंपळगाव रोठा (तालुका पारनेर) येथील जय मल्हार विद्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या दिवसाचे औचित्य साधून जय मल्हार विद्यालयात देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी रंग दे बसंती चोला या गीतामधून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना प्रत्यक्ष फाशी देण्याचा देखावा सुंदर सादर केला, झुंजूमुंजू पहाट झाली या गीतामधून तर विद्यालयातील तब्बल २७ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली. या कार्यक्रमाला पावसाचे वातावरण असून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अक्षरशः प्रेक्षक गाण्याच्या ठेक्यावर मंत्रमुग्ध झाले होते. एका देशभक्तीपर गीतामधून जो देखावा सादर केला गेला त्या देखाव्याने तर संपूर्ण माता भगिनीच्या अक्षरशा डोळ्यात पाणी जमा झाले.
.यावेळी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा यांच्यातर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी विनायक दादाभाऊ सुंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विनंतीला मान देऊन विनायक सुंदरे यांनी २२००० हजार रु. किमतीचे इन्व्हर्टर शाळेला देण्याचे घोषित केले.
याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड . विश्वस्त किसन मुंडे विश्वस्त हनुमंत सुपेकर व सर्व विश्वस्त .उपसरपंच महादेव पुंडे .ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,सेवा सोसायटीचे संचालक गंगाराम पुंडे, शांताराम खुशी माजी सरपंच नानाभाऊ भामरे माजी सरपंच बबन चिमाजी पुंडे, बबन शेठ गायकवाड, दिलीप घुले, तानाजी मुळे, अंकुश शेठ नरवडे, सुनील बर्वे ,रवी शेठ नवले, जालिंदर खोशे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, राजाराम मुंडे ,योगेश पुंडे ,नवनाथ पुंडे, सचिन पुंडे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गंगाराम शेठ घुले, संभाजी मुंढे, धोंडीभाऊ जगताप ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक तसेच पंचक्रोशीतील प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.