श्री.शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार

कर्जत-श्री संत सद्गुरु गोदड महाराज अधिकृत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांच्या सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमास कर्जत, जि.अहिल्यानगर येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा.राम शिंदे यांचे उपस्थित पार पडला
या प्रसंगी जेष्ठनेते श्री.मधुकर आबा राळेभात, माजी जि.प.सदस्य श्री.प्रविण घुले, तालुकाध्यक्ष श्री.शेखर खरमरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुनील यादव, नगरसेवक श्री.विनोद दळवी, माजी नगरसेवक श्री.अनिल गदादे, श्री.काकासाहेब धांडे, श्री.काकासाहेब ढेरे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आरंभी श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांना सभापती महोदयांनी अभिवादन केले.
याप्रसंगी साहेबांचा सत्कार केल्याबद्दल आयोजक व नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार त्यांनी मानले.यावेळी उपस्थित जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले.व श्री.शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.