जवळे येथील दोन कुटुंबातील फौजदारी वाद सामोपचाराने मिटला …! .

लोकजागृती सामाजिक संस्थेचा पुढाकार
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:
जवळे तालुका पारनेर येथील दोन कुटुंबातील परस्पर विरोधातील दाखल असलेले फौजदारी गुन्हे निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने मिटवण्यात आले . याविषयी अधिक माहिती कि , जवळे तालुका पारनेर येथील शेतकरी गंगाधर दगडू सालके व शिवाजी शंकर सालके यांच्यात
भावकितील वादावरून एकमेकांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते .
या कुटुंबियांत गेल्या अनेक वर्षांपासून भावकीतील जमीन व रस्त्यांवरून वादविवाद सुरू होते . यातूनच एका वादामुळे एकमेकांनी परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल केले होते . त्यानंतर दोघांनीही सदरचे गुन्हे रद्द होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या . दोघांची मागणी गुन्हे रद्द करा हि एकच असल्याने खंडपीठाने या दोन्ही याचिका एकाच वेळेस सुनावनीसाठी त्यांचे समोर ठेवण्याची सूचना केली . न्यायालयाने दोघांचीही बाजु ऐकल्यानंतर त्यांची एकच असल्याने न्यायालयाने हा
भावकीतील व जवळच्या नातलगांचा वाद दिसतो आहे . तो परस्पर मिटत असेल तर पहा अशा तोंडी सूचना वकीलांना दिल्या . न्यायमुर्तीच्या सूचनेवरून त्यातील एका पार्टीने
लोकजागृती सामाजिक संस्थेकडे याबाबत सल्ला मागितला .
लोकजागृती सामाजिक संस्थेच्या
पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही बोलावून घेत त्यांची भूमिका समजून घेतली व हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचे आवाहन केले . त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी वाद मिटवत असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालय समोर सादर केले . प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर सरकारी पक्षाने यावर आक्षेप नोंदवत या दोघांमुळे सरकारी यंत्रणेचा नाहक वेळ गेला म्हणून यांना दंड करण्याची मागणी केली . परंतु न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणने फेटाळून लावले . व गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी यांना न्यायालयाने वाद मिटवण्याला सहमती असल्याबाबत विचारणा केली . त्यावर आम्ही गावातील ग्रामस्थांच्या व नातेवाईकांच्या मध्यस्थीने हा वाद सामोपचाराने मिरवत असल्याचे व यापुढे वादविवाद करणार नाही अशी हमी दिली. त्यानंतर न्यायालयाने दोघांही आरोपींवरील दाखल
झालेल्या फिर्यादी व आरोपपत्र रद्द करत असल्याचा निर्णय दिला . हा निर्णय न्यायमुर्ती मंगेश पाटील व न्यायमुर्ती अभय वाघवासे यांच्या न्यायपिठाने दिला . यावेळी न्यायालयात वकील अरविंद अंबेटकर व अभिजीत आव्हाड यांनी आरोपींची बाजू मांडली .
- इतरांनी हा आदर्श घ्यावा …. !
- कोणत्याही वादविवादाची तीव्रता सुरुवातीला काही काळापर्यंत टिकून असते . नंतर न्यायालयातील किचकट प्रवास सुरू झाल्यानंतर वादविवाद करणाऱ्यांची दमछाक होते . त्यामुळे दोघांचेही मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होते . म्हणून या केस प्रमाणे इतरांनी सामोपचाराची भूमिका घेऊन वाद – विवाद मिटवावेत . असे आवाहन लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे .
- असे तंटे मिटवणारांना लोकजागृती संस्था मोफत मार्गदर्शन करील .
- रामदास घावटे .
अध्यक्ष – लोकजागृती सामाजिक संस्था , निघोज ]