म्हसोबाझाप ग्रामपंचायत मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील म्हसोबा झाप येथे स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रकाश गाजरे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. गावातील कन्हेर, गाढवे झाप, शिंदेवाडी, भोरवाडी, भोसर माळ, गाजरे झाप, गुरवेवाडी, म्हसोबा झाप, गावठाण व बीबीचा दरा या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने शैक्षणिक शालेय साहित्य यावेळी देण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने म्हसोबा झाप ग्रामपंचायतने सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. ग्रामपंचायत समोर ध्वजवंदन करत सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्नही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास आहेर होते.
दरम्यान सरपंच प्रकाश गाजरे म्हसोबा झाप ग्रामपंचायत व निलेश लंके प्रतिष्ठान तसेच संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गावात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
यावेळी आदर्श सरपंच प्रकाश गाजरे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामविकासासाठी मोठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. ग्रामविकास जेव्हा साधला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने हा विकसनशील भारत विकासात्मक पातळीवर महासत्ता नक्कीच बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे गाव विकासासाठी एक ग्राम चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शासनाने हर घर तिरंगा ही मोहीम खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर यशस्वी केली. म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्येही हे अभियान राबवून राष्ट्रीय एकात्मता सर्वांनी जपली आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करत अमृत महोत्सवी वर्ष हे समाज उपयोगी उपक्रमांनी आम्ही साजरे केले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी अशोक आहेर, गणेश वाळूंज, अण्णा आहेर, विलास आहेर, अर्जून आहेर, बबन गिरी, बाबाजी दरेकर, बाळासाहेब वाळूंज, बाळू आहेर, उत्तम दाते, हरी रोहकले, गणेश वाकळे, सावकार आहेर, चंद्रकांत शिंदे, अकुश आहेर, सावकार आरोटे, रंगनाथ दरेकर, सीताराम दाते, बाळू शिंदे, किसन दरेकर, माऊली जाधव, झांबर आहेर, पोपट आहेर, लखन शिंदे, माधव आहेर, अविनाश आहेर, बाबाजी पानमंद, कैलास आहेर, अक्षय रोहकले, सुशांत भालके, सुधीर शिंदे, प्रदीप आहेर, नवनाथ वाळूंज, बाबू वाकळे, प्रथमेश दाते, माऊली आरोटे, आदीत्य भालके, खंडू भालके, अजित रोहकले, अजित सहाने, रामदास शिंदे, चिकने बाबा, आदी म्हसोबा झाप येथील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.