इतर

सामान्य माणसाच्या हितासाठीच कम्युनिष्ठांचा लढा– कॉ. सुभाष लांडे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


सामान्य माणसांचे सामर्थ जेव्हा एकवटते तेव्हा सामाजिक बद्दल घडतात, वेळप्रसंगी सरकारला झुकावे लागते, सर्व सामान्य माणसाच्या हिता साठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढत असतो. असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अहमदनगर जिल्हा अधिवेशन म्हणजेच 24 वी पक्ष परिषद कॉ. कारभारी उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळीं विचारपिठावर भारतीय महिला फेडरेशन च्या राज्य अध्यक्षा कॉ.स्मिता पानसरे, शांताराम वाळुंज, कॉ. पांडुरंग शिंदे, निर्मलाताई काटे, प्रा. मेहबूब सय्यद, कॉ अनंत लोखंडे, भारती न्यायपेल्ली, विलास मेश्राम, अशोक सब्बन, ज्ञानदेव पांडूळे, अड्ड. सुधीर टोकेकर,भाऊसाहेब थोटे, संध्या मेढे, संजय झिंजे, राज्य सह सचिव ऍड्ड सुभाष लांडे,अड्ड. आझाद ठुबे, डॉ राधेश्याम गुंजाळ, डॉ बाप्पू चंदनशिवे, शब्दगंध चे कार्यवाह कवी सुभाष सोनवणे उपस्थित होते.
पुढे बोलताना कॉ. भस्मे म्हणाले की, भांडवलदाराना मोठे करणारे सरकार खाली खेचून सर्व सामान्य माणसांचे सरकार आले पाहिजे.


कॉ. सुभाष लांडे प्रास्ताविक करतांना म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील समविचारी संघटनांच्या वतीने विवीध आंदोलने करण्यात आली, त्यातुन सर्वसामान्य माणसांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न झाला.
शोषणकर्ता कोण हे आजकाल समजत नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न होत नाही, राजसत्ता जोपर्यंत ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत काही करता येत नाही त्यामुळे त्यासाठीच प्रयत्न व्हायला पाहिजे, माणसात देव पाहाता येईल असा धर्म सर्वांना हवा आहे. त्यासाठी सुधारणा व्हायला पाहिजे. असे मत ज्ञानदेव पांडूळे यांनी व्यक्त केले.
न्यु आर्टस् कॉलेज समोरील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ पासुन घोषणा देत रेली निघून कॉ राम रत्नाकर चौकातून शिव पवन कार्यालयांत पोहचले, यावेळी लालभावटा हातात घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.
अधिवेशन उद्घाटन प्रसंगी शिर्डी लोकसभा प्रभारी बंशी सातपुते,कॉ भैरवनाथ वाकळे, कॉ हरीभाऊ नजन, कॉ संतोष खोडदे, रामदास वाघस्कर,अशोक गायकवाड, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, विकास गेरांगे, फिरोज शेख, आनंद गोलवड, चंद्रकांत माळी, रावसाहेब कर्पे, डॉ गणेश विधाते, कॉ.रमेश नागवडे, राजेंद्र गांधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.मेहबूब सय्यद, कॉ आनंद लोखंडे, होकर्स युनियन चे संजय झिंजे, राजेंद्र गांधी, भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन चे अशोक सब्बन, निर्मलाताई काटे, ज्ञानदेव पांडूळे, प्रा बाप्पु चंदनशिवे, सुभाष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एल. बी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी कॉ भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button