
निवडणुकीत दडपशाही व दंडुकेशाहीला मतदारांचे चोख उत्तर : डॉ. भाऊसाहेब खिलारी
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या उत्तर पट्ट्यातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी सेवा सोसायटी म्हणजे टाकळीढोकेश्वर सेवा सोसायटी नुकतीच या सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली
टाकळी ढोकेश्वर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप प्रणित जनसेवा पॅनलला १० तर आमदार निलेश लंके प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्री ढोकेश्वर शेतकरी पॅनेलल ३ जागा मिळाल्या आहेत. या सेवा संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जवळजवळ ३० टक्के मतदान क्रॉस झाल्याने जनसेवा पॅनलला आपला तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे जनसेवा पॅनलने १० जागा जिंकल्या तर या निवडणुकीत आमदार निलेश लंके गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
वनकुटे सेवा सोसायटी पाठोपाठ टाकळीढो केश्वर सेवा सोसायटी निवडणुकीत आमदार निलेश लंके गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत १ हजार १५ पैकी ९२० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळजवळ ९०% टक्के मतदान या निवडणुकीत झाले.
दरम्यान बुधवारी या निवडणुकीत मतदान केंद्र १ वर ३५० पैकी ३३४ मतदान झाले तर, मतदानकेंद्र २ वर ३५० पैकी ३१७ मतदान झाले व मतदान केंद्र ३ वर ३०० पैकी २६९ मतदान झाले आहे.
टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अटितटीच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक १५ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.
राजकीय दृष्टया महत्वपुर्ण समजल्या जाणा-या टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षीक निवडणूकीत १३ जागेसाठी २६ उमेदवार रिंगनात होते. या दोन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु अखेर या निवडणुकीत शिवसेना भाजप प्रणित खासदार सुजय विखे पाटील यांच्या टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी गटाने बाजी मारली.
टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षीक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके प्रणित श्री ढोकेश्वर शेतकरी सहकारी पँनल व खासदार सुजय विखे पाटील व शिवसेना प्रणित जनसेवा पँनल अशी सरळ सरळ लढत झाली.
या सेवा संस्थेसाठी सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून शिवाजी काशिनाथ खिलारी (४५०), जयसिंग बबन झावरे (४५२), नारायण यशवंत झावरे (५१०), विलास रामदास झावरे (५५३), मल्हारी गणपत धुमाळ (४३७), महेश गोवर्धन पाटील (४९८), बबन सावळेराम पायमोडे (४४५) बबन सोनबा बांडे (४३०) तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून श्रावण गोपाळा गायकवाड (५४६), महिला राखीव प्रवर्गातून सुंदराबाई भाऊसाहेब गोरडे (४९१), अलकाबाई नानासाहेब बांडे (४९७) तर इतर मागास प्रवर्गातून मोहन शंकर रांधवण (४७५) व भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून दौलत मारुती जेजुरकर (५०४) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
टाकळी ढोकेश्वर सेवा सोसायटी मध्ये खासदार सुजय विखे व आमदार विजय औटी यांच्या भाजप व शिवसेना प्रणित जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे मतदारांनी धन शक्तीचा पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा विजय झाला असून दडपशाही व दंडुकेशाहीला मतदारांनी चौक उत्तर दिले आहे.
डॉ. भाऊसाहेब खिलारी
( शिवसेना व भाजप प्रणित जनसेवा पॅनल)