अकोल्यात विकासाचा बॅक लॉग भरून काढू-आमदार लहामटे

बोरी पाझर तलावाचे जलपूजन सम्पन्न
कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ व बोरी गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा बोरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने आज या जलाशयाचे आमदार डॉ किरण लहामटेंचे हस्ते शासकीय जलपूजन करण्यात आले
यावेळी जेष्ठ नेते अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर , अगस्तीचे संचालक महेश नवले, कैलासराव शेळके, राष्ट्रवादी चे बबलू देशमुख जिल्हा परीषद माजी सदस्य रमेश शेंगाळ तात्याबापू साबळे ,शाखा अभियंता अभिजित देशमुख बबलू देशमुख संजय साबळे भास्कर साबळे ,रामनाथ साबळे ,अभिजित देशमुख, रविंद्र आरोटे अतुल चौधरी, दारकू कचरे ,दामू साबळे,रघुनाथ जाधव, अशोक डेरे , रामनाथ बांगर, ग्रामसेवक श्री भोकटे , कुंडलिक कचरे रोहिदास पवार ,दादाभाऊ साबळे , आदी ग्रामस्थ उपस्थित होते
सरपंच संजय साबळे ,शांताराम साबळे यांनी यावेळी परिसररातील रस्ते वीज व इतर समस्या आमदार लहामटे यांच्या समोर मांडल्या याची दखल घेत आमदार लहामटें यांनी वीज प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या सूचना वीज वितरण अधिकाऱ्यां दूर ध्व नी वरून दिल्या
आमदार लहामटेंहेलपाटे मारायला लावणारे आमदार नाही –नवले
आमदार लहामटें हे हेलपाटे मारायला लावनारे आणि वाट पाहायला लावनरे आमदार नाही असे यावेळी महेश नवले यांनी आपल्या मनो गतात सांगितले

तर स्वातंत्र्या नंतरही अकोले तालुक्यात विकास कामांचा मोठा बॅकलॉग राहिला आहे तो टप्याटप्याने पूर्ण केला जाईल त्यासाठी आपण कामाची गती वाढविणे आवश्यक आहे बॅकलॉग भरून काढू आढळा मुळा प्रवरा या अशा सर्वच भागात बॅकलॉग भरून काढू आमदार भेटत नाही नाही प्रश्न ऐकून घेत नाही हा प्रश्न सुटला आहे आणखी दोन वर्षे बाकी आहे दोन वर्षात उर्वरित प्रश्न मार्गी लावू अगस्ती कारखान्या ची निवडणूक न्यायालत गेली आहे तोही प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलासंजय साबळे यांनी प्रास्ताविक केले तर कॉ सदाशिव साबळे यांनी सूत्रसंचालन केले
