मोनिकाताई राजळे यांच्याकडून आगळे कुटुंबियांचे सांत्वन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथीलआगळे कुटुंबातील स्वर्गीय आसराबाई नामदेव आगळे यांचे काही दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी भेट घेतली व सांत्वन केले.
यावेळी त्यांनी धरणग्रस्त कुटुंबाविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. यामध्ये जायकवाडी जलाशयाने विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांना सावरता आले नाही, याविषयी खेद व्यक्त केला. शेवगाव- नेवासा- गंगापूर- पैठण तालुक्यातील अनेक गावे विस्थापित झाले. त्यापैकी एक नेवासा तालुक्यातील खामगाव येथील आगळे कुटुंब गेल्या सहा दशकांपूर्वी जायकवाडी जलाशयाने विस्थापित झाल्याने ते भायगाव या ठिकाणी स्थायिक झाले. याच ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय करून आर्थिक घडी बसवली.धरणग्रस्त अनेक कुटुंबांना भेटी दिल्यानंतर ते करीत असलेल्या संघर्षाबाबत आजही त्यांच्या वेदना ताज्या वाटतात अशा शब्दात आमदार राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर, भाजपा युवा मोर्चाचे लक्ष्मण काशीद, संदीप खरड,संतोष आढाव,अशोक देशपांडे, आसाराम न-हे, कल्याण जगदाळे,आप्पासाहेब सुकाशे, आदिनाथ लांडे ,भागचंद कुंडकर, गणेश आहेर, चंद्रभान आगळे, भीमराज आगळे, नामदेव आरगडे, दत्तू आगळे, अमोल आगळे, हरिभाऊ पवार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भगवान आगळे, आदिनाथ आगळे, नवनाथ आगळे, ओंकार लांडे, चैतन्य आगळे, पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह आगळे कुटुंबातील सदस्य हजर होते.
