पैठणवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करून हासे कुटुंबीयांनी केला मुलीचा वाढदिवस साजरा

कोतुळ प्रतिनिधी
हासे कुटुंबीयांकडून मुलीच्या वाढदिवसानिमित्त
पैठणवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप:अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील जि.प. प्रा. शाळा पैठणवाडी शाळेत हासे कुटुंबीयांनी मुलांना शालेय साहित्य वाटप करून मुलीचा वाढदिवस साजरा केला
रूंभोडी (ता अकोले) येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. दिपक चंद्रभान हासे व सौ. शुभांगीताई हासे (मुंबई पोलीस) या दांपत्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे घोषवाक्य सार्थ ठरवित त्यांची सुकन्या कु. सौम्या हिचा ५ वा वाढदिवस अकोले तालुक्यातील जि.प. शाळा पैठणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.
याप्रसंगी श्री. दिपक हासे व सौ. शुभांगी हासे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब कुटुंबातील
मुलांना ब्रॅन्डेड कंपनीचे शूज, सॉक्स, वह्या, शिसपेन्सिल पाट्या, रंगपेटी, शार्पनर, खोडरबर, कंपासपेटी,
शिक्षकांसाठी शैक्षणिक किट, तसेच सर्व मुलांना खाऊवाटप केले.कु. सौम्या हिच्या वाढदिवसानिमित्त श्री. सदाशिव भोर (आजोबा), श्री सचिन भोर (मामा) श्री. अक्षय कासार (काका), ऐश्वर्या कानवडे (मावशी) इ. उपस्थित होते. या प्रसंगी शा. व्य. समितीचे अध्यक्ष श्री.
भाऊसाहेब गंभिरे व ग्रामस्थ देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. भाऊसाहेब
गांडाळ सर यांनी तर मुख्याध्यापक श्री. मोहन वाल्हेकर सर यांनी आभार मानले. कार्यक्रम नियोजन कामी श्री शिवा भोर सरांचे सहकार्य लाभले.
