निराधार महिलांसाठी स्वयंरोजगाराचे ”नऊवारी साड्यांचे ” अॉनलाईन प्रशिक्षण

.
पद्मशाली सखी संघम आणि लिबर्टी इन्स्टिटय़ूट (दिलीप कारमपुरी – पुणे) चा विनामूल्य उपक्रम….
सोलापूर : स्वयंरोजगार प्रत्येकांना गरजेचे आहे. पद्मशाली समाजातील महिलाही स्वकर्तृत्वाने काहीतरी करण्याच्या इराद्याने स्वयंरोजगाराच्या संधीच्या शोधात आहेत. सध्या सर्वत्रच फॅशनचे चलती असून पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ”लिबर्टी इन्स्टिट्यूट” (दिलीप कारमपुरी सरांचे) आणि सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून पद्मशाली समाजातील निराधार असलेल्या महिलांसाठी ‘विनामूल्य’ ‘नऊवारी साड्यांचे’ अॉनलाईन प्रशिक्षण शनिवार, २७ अॉगस्ट रोजी रोजी सायंकाळी ठीक (शार्प) ४.३० वाजता झूम वेबीनार माध्यमातून करण्यात येत आहे, अशी माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे यांनी दिले आहे.
अॉनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम वेळेवर सुरुवात होणार असून विडी कामगार असलेल्या महिलांनी आपल्या मुलींना विड्या वगळण्याच्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलून देतात. भविष्यात तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्यास धोका निर्माण होतोच. यासाठी निराधार असलेल्या महिलांसाठी आणि मुलींसाठी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून विनामूल्य (मोफत) शिकण्याचे संधी आहे. यामाध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी स्वतःचे मोबाईल रिचार्ज आणि चार्जिंग करुन ठेवा. सध्या पावसाळा असून कधीही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. या अॉनलाईन प्रशिक्षणात ब्राम्हणी, पेशवाई, मराठामौळी, लावणी आणि मस्तानी अशा पाच प्रकारच्या नऊवारी साड्या शिकू शकता. यासाठी शिक्षणाची अट नसून घरातील जुन्या साड्या प्रशिक्षणासाठी वापर करता येईल. फक्त आवड असण्याची गरज आहे. [नांवनोंदणी करतील अशांनाच ”वेबीनारचे लिंक” देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. ]
ह्या अॉनलाईन प्रशिक्षणाकरिता श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे. जास्तीत जास्त पद्मशाली समाजातील महिलांनी विनामूल्य असलेल्या नऊवारी साड्यांच्या प्रशिक्षणात सामील होण्यासाठी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. माधवीताई अंदे (8788970814) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन सखी संघमच्या उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा राधिका आडम, सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, खजिनदार प्रभावती मद्दा, सहखजिनदार ममता मुदगुंडी यांनी केल्या आहेत.