रोमच्या मदर जनरल सिस्टर यांची ज्ञानमाऊली विद्यालयास सदिच्छा भेट…

दत्तात्रय शिंदे
नेवासा- सेंट जोसेफ ऑफ अपारेशन कॉन्व्हेंच्या प्रमुख मदर जनरल सिस्टर मोनिका व जनरल कौंसिल मधील सिस्टर अनिटा यांची रोम शहरातून ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल, घोडेगाव येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांचे भारतीय परंपरेनुसार भव्य दिव्य असे शाळेतील सिस्टर्स, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साठी भारतीय संस्कृती जपत विविध सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी सादर केले.
रोमच्या मदर जनरल सिस्टर यांची ज्ञानमाऊली विद्यालयास सदिच्छा भेट…
मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सेंट जोसेफ ऑफ अपारेशन कॉन्व्हेंच्या प्रमुख मदर जनरल सिस्टर मोनिका व जनरल कौंसिल मधील सिस्टर अनिटा यांची रोम शहरातून ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल, घोडेगाव येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे भारतीय परंपरेनुसार भव्य दिव्य असे शाळेतील सिस्टर्स, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साठी भारतीय संस्कृती जपत विविध सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी सादर केले.

जून २०२३ पासून सेंट जोसेफ ऑफ द अपारेशन कॉन्व्हेंच्या सिस्टर्स यांनी ज्ञानमाऊली शाळेचे सूत्र हाती घेतले आहे. आणि ते आल्यानंतर शाळेमध्ये आमुलाग्र बदल त्या करत आहेत. विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष त्या देत आहेत. पालकांना देखील त्या वेळ देत आहेत व विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. शिक्षकांकडून देखील त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे. त्यांच्यासाठी हे एक नवीन मिशन आहे. स्वतः ला त्यांनी या पवित्र कार्यास झोकून दिले आहे. आज रोजी शाळेच्या प्रिन्सिपल सि. क्विनीटा डिसोझा, सेक्रेटरी सि. निलमनी, व शिक्षिका सि. रफिला सि. लीना या आहेत. आणि शाळेच्या उन्नतीसाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. हेच नवीन मिशन बघण्यासाठी खास रोम शहरातून मदर जनरल सिस्टर स्वतः बघण्यासाठी आल्या होत्या. हा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सर्व सिस्टर्स, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी फार परिश्रम घेतले…
