शिर्डीत साई भक्ताची फसवणूक

शिर्डी-दि 23
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या आग्रा येथील एका भाविकाला फसविल्याची घटना घडली
एका भामट्याने 40 रुपयांची उद पॅकेट तब्बल 7 हजार रुपये या भाविकांकडून उकळले
एका सामान्य कुटुंबातील हा साईभक्त असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षत आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठले
साईबाबांच्या धुनीत जाळण्यासाठी अनेक साईभक्त ऊद पॅकेट खरेदी करतात. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये हे पॅकेट 1 ते 2 रुपयांना विकले जाते. मात्र आग्रा येथील या साईभक्ताच्या भावनांचा फायदा घेत व त्याची दिशाभूल करून एका भामट्याने 1 ते 2 रुपयांना मिळणारे हे ऊद पॅकेट प्रत्येकी 175 रुपयांना विकले.
40 ऊद पॅकेटसाठी या भामट्याने या भाविकाकडून तब्बल 7 हजार रुपये उकळले आणि पसार झाला. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असतांंना आणखी एका ठिकाणी ऊद पॅकेटबद्दल चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे भाविकाच्या लक्षात आले. साईभक्त दिपेश कुमार जॉली असे या साई भक्तांचे नाव असून त्यांनी लगेच शिर्डी पोलीस स्टेशन गाठले. शिर्डी पोलीसांनी अर्ध्या तासातच त्या भामट्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले.त्याचे कडून उकळले ले जादा पैसे भाविकाला परत दिले
या साई भक्ताने शिर्डी पोलिसांचे आभार मानले