मताधिकार जनजागृतीसाठी गणेशोत्सवात सजावट स्पर्धा साठी आवाहन
-: प
मताधिकार जनजागृतीसाठी गणेशोत्सवात सजावट स्पर्धा घरगुती सार्वजनिक मंडळांना 216 अकोले विधानसभा मतदार
संघ अधिकारी यांचे अवाहन:-
राज्याच्या मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” या विषयावर
घरगुती देखावा आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
आहे.
या स्पर्धेत 216 अकोले (अ.ज) विधान सभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी व गणेशोत्सव
मंडळांनी सहभाग घ्यावा, असे अवाहन श्री सतिश थेटे सहा मतदार नोंदणी अधिकारी 216 अकोले (अ.ज) विधानसभा
मतदार संघ तथा तहसीलदार अकोले यांनी केले आहे. मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी “माझा गणेशोत्सव माझा
मताधिकार” या विषयासंबंधी स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरित्या ही
नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेची सविस्तर नियमावली संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर
देण्यात आलेली आहे. स्पर्धकांनी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत संकेतस्थळावरील उपलब्ध अर्जावरील माहिती
भरून आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे, अशी माहिती तहसीलदार यांनी दिली. स्पर्धेसाठी फोटो आणि
ध्वनिचित्रफित हे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला
आधार कार्डची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशीलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी
लागू झालेल्या चार अर्हता तारखा यांसाठीचा प्रसार प्रचार करणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने “आपले नाव मतदार यादीत नोंदविणे, मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी
मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे” हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सजावट करावी. तसेच मंडळांनी देखाव्यांच्या
माध्यमातून तर घरगुती पातळीवर गणेश मुर्तीची सजावट करून दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची
जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवावी. मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला
लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या
देखावा व सजावटीतून जागृती करावी.
(सतिश थेटे )
सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा
तहसीलदार अकोले
2022-156