उरण मधील अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा

उरण रायगड
( हेमंत सुरेश देशमुख)
आज दिनांक 25/08/2022 गुरुवारी रोजी जेएनपीटी मल्टीपर्पाज हॉल टाऊनशिप उरण येथे आजी माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, सामाजिक संस्था संघटना चे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती ह्यावेळी जवळपास सर्वच पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते
समाजसेवक सुधाकर पाटील, समाजसेवक संतोष पवार , राष्ट्रवादी काँगेस चे प्रंशांत पाटिल , शिवसेना चे नरेश रहाळकर , तहसीलदार, पोलीस अधिकारी, इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील रस्त्यांवर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी , कंटेनर -ट्रेलरची अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहतूक , त्यामुळे होणारे जीवघेणे रस्ते अपघात इ. बाबत गुरुवार दि २५ ऑगस्ट रोजी मल्टिपर्पज हॉल , जेएनपीटी टाऊनशिप , उरण येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले
. . 22 रोजी आम्ही विभागीय आयुक्त , कोकण विभाग यांची भेट घेतली . त्यांनी प्रांत आणि तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत
तसेच पोलीस उपायुक्त , वाहतूक विभाग यांचीही भेट घेतली . त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक , वाहतूक विभाग , उरण यांना नियम मोडणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .