आजचे पंचांग व राशिभविष्य दि २६/०८/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०४ शके १९४४
दिनांक :- २६/०८/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति १२:२५,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १८:३३,
योग :- परिघ समाप्ति २६:११,
करण :- चतुप्षाद समाप्ति २५:०९,
चंद्र राशि :- कर्क,(१८:३३नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५७ ते १२:३१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०२:०५ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
दर्श-पिठोरी अमावास्या(पोळा), वृषभपूजन, मातृदिन, दर्भाहरण, मृत्यु १८:३३ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०४ शके १९४४
दिनांक = २६/०८/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
अचानक येणार्या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.
वृषभ
दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
मिथुन
उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.
कर्क
चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.
सिंह
बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.
कन्या
जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.
तूळ
दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.
वृश्चिक
सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्यांनी भडक शब्द वापरू नयेत. एखादी घटना द्विधावस्था वाढवेल.
धनू
बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
मकर
ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.
कुंभ
दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.
मीन
शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर