राजूर च्या प्रदर्शनात अवैध दारू व जुगार खेळ बंद ठेवा राजुर पोलीस स्टेशनला दिले निवेदन

अकोले प्रतिनिधी
,
दि २१ ते २४ डिसेंबर दरम्यान ( राजूर ता अकोले) येथे भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन पार पडत आहे या प्रदर्शनात पुणे, नगर, नाशिक, ठाणे , या जिल्ह्यातील लाखो शेतकरी हजेरी लावतात शेतकऱ्यांच्या या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर जुगाराचे खेळ लावून यात्रेकरूंना कंगाल केले जाते तसेच अवैद्य दारूची विक्री केली जाते ही दारू विक्री व जुगार चे खेळ बंद ठेवण्यात यावी असे मागणी आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी आज राजुर पोलीस स्टेशन कडे केली
राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी- विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही
जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात. नगर, नाशिक, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात. सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली हजेरी लावत असतात.

विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात. या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
-या प्रदर्शनात अनेक भागातून लाखो लोकांची उपस्थित रहाते यात करमणुकीचे खेळ,रहाट पाळणे,लहान मुलांचे आकर्षण असते अनेक व्यावसायिकांचे दुकाने खेळणी ,खाद्य पदार्थ विक्री चे दुकाने थाटली जातात
या गर्दीचा फायदा घेत दारूबंदी असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री तुन मोठी उलाढाल होते तसेच चक्री जुगारासारखे खेळातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते याकडे राजुर पोलीस स्टेशन आणि राजुर ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी करणारे निवेदन आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आर पी आय चे युवक तालुकाध्यक्ष विजय पवार यांनी आज राजूर चे पोलीस निरीक्षक यांना समक्ष भेटून दिले यावेळी विजय पवार ,राजुर विभाग अध्यक्ष शंकर वायळ, घाटघर विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे, अर्जुन कोरडे, दिलीप पटेकर, नारायण पटेकर, शरद देशमुख, महेश देशमुख, सचिन देशमुख, अशोक पटेकर, सौरभ देशमुख. आदी कार्यकर्ते उपस्थित होते
प्रदर्शनात रहाट पाळणे या खेळामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही यासाठी रहाट पाळणे या खेळांना उंचीची मर्यादा घालून द्यावी अशी मागणी श्री विजय पवार यांनी