पारनेर तालुक्यातील प्रश्न मुंबईत मनसे च्या दरबारात!

पारनेर मनसे पद पदाधिकाऱ्यांनी
घेतली शर्मिला ठाकरे यांची भेट
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने करत असलेले तालुक्यातील कामाचा अहवाल तसेच नगर- पुणे महामार्गावर एक महिन्या पासुन सुरु असलेल्या अपघातात व सार्वजनिक बांधकाम विभागाचे व चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका यांचे दुर्लक्ष, कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना चाललेली टोलवसुली तसेच सुपा एमआयडीसी मध्ये कामगारांच्या समस्या,शेतकरी समस्या, शालेय विद्यार्थी समस्या, प्रशासकीय कामातील अडथळे, अडचणी अशा पारनेर तालुक्यातील विविध विषयांवर मुबईत मनसेच्या दरबारात चर्चा झाली
मुंबई येथे शिवतीर्थ या ठिकाणी सौ.शर्मिला राज ठाकरे, मनसे नेते अमित राज ठाकरे , अनिल शिदोरे , अविनाश अभ्यंकर ,पक्ष प्रवक्ते संदिप देशपांडे , मनसे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन मोरे ,माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अरविंद गावडे ,सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे , सहकार सेना महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष डी.एन.साबळे ,जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ , नितीन म्हस्के सहकार सेना जिल्हा अध्यक्ष, अविनाश पवार पारनेर तालुका उपाध्यक्ष, हे या वेळी उपस्थितीत होते
जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेही कमी पडणार नाही. गरज भासली तर कायदेशीर मार्गाने अथवा खळखट्याक मार्गाने जनतेच्या सेवेसाठी सदैव प्रयत्न करत राहा व कुठे गरज पडली तर पुर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे असे मनसे पदाधिकर्यांनी आश्वासीत करण्यात आल्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
नगर~पुणे महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातांच्या गंभीर प्रश्नावर पारनेर मनसेचे नेते अविनाश पवार यांनी सहकाऱ्यांसह थेट कृष्णकुंज गाठले. राजसाहेब दौऱ्यावर असल्यामुळे शर्मिलाताई यांनी पारनेर तालुक्यातील सर्व विषयांवर चर्चा करत जनतेच्या प्रश्नावर तुम्ही लढत रहा तुमच्या पाठीशी संपुर्ण महाराष्ट्र उभा करू असा आशिर्वाद मिळाल्याने नवी उर्जा प्राप्त झालेले पारनेरचे मनसैनिक नव्या ताकदीने लढ्यासाठी सज्ज झालेत