इतर

अकोल्यात ओबीसी ची संघटनात्मक बैठक सम्पन्न

जनतेतून सरपंच निवडीतून ओबीसींचे संगठन दिसावे -माजी आमदार पांडुरंग अभंग

अकोले -राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास त्याची समाज निश्चित जाणीव ठेवतो जोडलेली माणसं विसरत नाही सामाजिक भान ठेवून संघटन केले पाहिजे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन वैचारिक देवाणघेवाणीतून आपल्या कामाला ऊर्जा मिळते सामाजिक काम करताना प्रत्येक क्षेत्रात आपले काम आणि कर्तृत्व सिद्ध करावे असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले

महात्मा फुले समता परिषद व ओबीसी महासंघा च्या वतीने आयोजित संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते

ते पुढे म्हणाले की कुणबी ही जात नसून तो व्यवसाय आहे , ओबीसींच्या जागांवर खऱ्या ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे आज जे आरक्षण ओबीसींना दिले आहे ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आता वाढली आहे आरक्षण लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे शासनाने आता जनतेतून सरपंच निवडण्याचे निर्णय घेतला आहे यामुळे आता गाव गावच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ओबीसींची मोट बांधावी ओबीसींनी गावोगावी एकत्र येऊन ओबीसींचे संघटन वाढावे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे त्यातूनच विचारांची देवाण-घेवाण होईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ओबीसींना जे जे आरक्षण घटनेने दिले आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसींच्या घटकांनी पुढे आले पाहिजे ओबीसींचा लढा हा केवळ नेतृत्वावर नसून कार्य कर्त्यांच्या बळावर असतो नेतृत्व कोणाचे असू द्या मात्र नेतृत्वाला कार्यकर्त्यांचे बळ हवे असते असे पांडुरंग अभंग यावेळी म्हणाले

आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींची वज्र मूठ बांधण्याची वेळ- पदमकांत कुदळे

पद्मकांत कुदळे यावेळी म्हणाले की ओबीसीं मध्ये फूट पडून ओबीसींना संपवण्याचा प्रयत्न प्रयत्न सुरू आहे त्यासाठी लढले पाहिजे ५५ टक्के ओबीसी असताना देखील एकजूट होत नाही ओबीसींची वज्र मूठ बांधण्याची वेळ आली आहे घटना बदलून आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे म्हणून आरक्षण वाचण्यासाठी एकजुटीने ओबीसींनी पुढे आले पाहिजे अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे पदमकांत कुदळे म्हणाले
महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर म्हणाले की आदरणीय छगन भुजबळ साहेबांची ताकद आपल्या सोबत आहे ओबीसीच्या सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन एक सामाजिक चळवळ उभी करावी ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी मोठी किंमत मोजली आहे त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नाही तर ती ओबीसी समाजासाठी ही मोठी किंमत मोजली आहे गावोगावी ओबीसी संघटन वाढले पाहिजे असे अंबादास गारुडकर म्हणाले

समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनीही ओबीसी संगटनात्मक बांधणीचे आवाहन केले

यावेळी अकोले तालुक्याचे वतीने माजी आमदार पांडुरंग अभंग, पदमकांत कुदळे,अंबादास गारुडकर, प्रशांत शिंदे, प्रकाश कुरे यांचा सत्कार करण्यावर आला

याप्रसंगी अकोल्यातील नगरसेवक प्रमोद मंडलिक अगस्तीचे संचालक बाळासाहेब ताजणे, संतोष मुर्तडक, ज्ञानेश्वर काकड, भाऊसाहेब मंडलिक बाळासाहेब वाकचौरे ,वसंतराव बाळसराफ, श्री मंडलिक , किरण चौधरी, के टी मंडलिक ,भाऊसाहेब वाकचौरे, सुनील गीते आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले

छगन भुजबळ यांची ताकद आपल्या सोबत आहे – अंबादास गारुडकर

याप्रसंगी समता परिषदेचे प्रकाश कुऱ्हे ,अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे दिलीपराव मंडलिक, माजी नगरसेवक नवनाथ गायकवाड, प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्कर मंडलिक,ग्राहक पंचायत चे मच्छिन्द्र मंडलिक सुरेश मंडलिक, भाऊसाहेब गीते ,नंदू गीते ,बबनराव तिकांडे,भाऊसाहेब जाधव, प्रफुल्ल ताजने, रावसाहेब नाईकवाडी ,मच्छिन्द्र भरीतकर,शिवाजी मंडलिक बबन मंडलिक आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button