महावितरण व पारेषण भरती प्रक्रियेची ची होळी राज्यात होणार आंदोलने

- पुणे प्रतिनिधी
महावितरण व महापारेषण वीज कंपन्यांत 15 ते 20 वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण व वयात सवलत न देताच प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) या साठी डिसेंबर 2014 पासून तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व तत्कालीन ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष मा.अण्णाजी देसाई व कोथरुड च्या आमदार मा.प्रा.डॉ.सौ:मेधाताई कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी 22 एप्रिल 2015 रोजी कंत्राटदार विरहित Nominal Muster roll ( NMR ) पद्धती साठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.या मनोज रानडे समितीचा अहवाल आला यात कंत्राटदार विरहित रोजगार व आरक्षण देण्याची शिफारस केली.

4 जानेवारी 2023 रोजी खाजगीकरणा च्या पार्श्वभूमीवर सह्याद्री शासकीय निवास स्थानी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कंत्राटी कामगारांना वयात सवलत देण्याचे मान्य केले. त्यांचा वेतनाचा पैसा त्यांना मिळेल असे घोषित केले.कंत्राटी कामगार संघाची बैठक घेऊ असे आश्वासन दिले मात्र सरकार स्थापने पासून एकही मिटिंग घेतली नसल्याने समस्यां वाढल्या आहेत.
त्यांनी केलेल्या सूचनेला केराची टोपली दाखवत वीज कंपनी प्रशासनाने या कंत्राटी कामगारांच्या पाठीत खंजिर खुपसल्याची भावना सर्व कष्टकरी कंत्राटी कामगार विश्वात झाली आहे.
ऊन,थंडी,वारा,पाऊस, निसर्ग व तोक्ते वादळ तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा व तमा न बाळगता जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरावठा करतांना शेकडो कंत्राटी कामगार मृत्यु मुखी पडले, अनेक जण अपंग झाले. मात्र त्यांना देखील सरकारने आर्थिक मदत केली नाही. शिवाय आता महापारेषण कंपनीत 1903 व महावितरण मध्ये 5815 जागा अशा एकूण 7718 पदांची भरती काढून एवढ्या कामगारांना बेरोजगार करण्याचा घाट प्रशासनाने मांडला. ऊर्जामंत्री यांच्या सूचना वजा आदेशाला बगल देत गरज सरो व व वैद्य मरो ही भूमिका प्रशासन कसे घेत आहे याचे संघटना पदाधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने या भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिराती ची होळी सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर झोन समोर करण्यात आली.
या वेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात,महामंत्री सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहुल बोडके, कार्याध्यक्ष अमर लोहार, जिल्हाध्यक्ष राहुल भालभर, मिलिंद कुडतरकर जिल्हा सचिव, प्रेमसागर देसाई संघटन मंत्री, जय माळी उपाध्यक्ष व शेकडो कामगार उपस्थित होते.
मा.ना.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठक न घेतल्यास त्यांच्या निवास स्थानी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी यांनी कळवले आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या सर्कल ऑफिस समोर दुपारी 1:30 वाजता या भरती प्रक्रियेची होळी करावी असे आवाहन कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी केले.