कापूर वृक्षरोपनाने स्मशानभूमीतील उग्र वास जाणार – पेनगोंडा..

‘
——————————-
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तर्फे
शांतीधाम स्मशानभूमीत कापूर रोपाचे वृक्षारोपण..
——————————-
सोलापूर -‘ कापूराचे रोप’ हा वटवृक्षात रुपांतर झाल्यास तब्बल अर्धा किलोमीटर परिसरातील नागरिकांना स्मशानभूमीतील उग्र वास जाऊन कापूराचेच वास पसरण्यास मदत होऊन भविष्यात स्मशानभूमीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. असे प्रतिपादन एमराया फार्मास्युटिकल्सचे एम.डी आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा यांनी केले आहे.
खासकरुन नाशिक येथून मागविलेल्या कापूर रोपाचे वृक्षारोपण आज रविवारी सकाळी पद्मशाली समाजाच्या शांतीधाम स्मशानभूमीत राष्ट्रीय हातमाग दिन, महर्षी मार्कंडेय महामुनींचे रथोत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सहसचिव अंबादास बिंगी, माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य अशोक यनगंटी, सामाजिक कार्यकर्ते दत्तू पोसा, वेणूगोपाल कोडम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, कापूरच्या वृक्षामुळे शांतीधाम स्मशानभूमीत येणा-या बांधवांना आणि स्मशानभूमीच्या बाहेरुन जाणाऱ्या नागरिकांना उग्रवासापासून आझादीच मिळेल .’कापूराचे रोप’ नाशिक येथून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी विशेष प्रयत्न करुन मागविले होते.
यावेळी श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, इंजिनीअर विनोद सग्गम आदींचे सहकार्य मिळाले आहे.
——-