संगमनेर च्या थोरात साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला!

संगमनेर प्रतिनिधी
काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यान आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे
महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आज जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार
3 एप्रिल 2025 पासून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे 29 एप्रिल 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी ची मुदत आहे . 11 मे2025 रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 12 मे 2025 रोजी निवडणूक निकाल घोषित केले जाणार आहेत.
2024 मध्ये पार पडलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे असा संघर्ष पाहायला मिळाला या संघर्षात महायुती कडून शिवसेनेचे उमेदवार आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला विधानसभेच्या या आठवणी ताज्या असतानाच संगमनेर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे आमदार अमोल खताळ यांनीही या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे जाहीर केले आहे यामुळे संगमनेरच्या कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विखे -थोरात यांचा पारंपारिक राजकीय संघर्ष दिसून येणार आहे
राज्य सहकारी प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवार 3 एप्रिलपासून ते बुधवार 9 एप्रिलपर्यंत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध होतील व याच कालावधीत ते स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता होईल. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी मंगळवार दि 15 एप्रिल2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
दाखल नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी मंगळवार 15 ते 29 एप्रिल पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलाआहे
नामनिर्देशन अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप शुक्रवार 2 मे2025 रोजी करण्यात येईल. सोमवार 11 मे 2025 रोजी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार असून मंगळवार 12 मे रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाईल.
निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहे