इतर

औरंगाबाद हायकोर्टात अगस्तीचा मार्ग मोकळा ! राज्य सरकार तोंडघशी पडले !


राज्य सरकार तोंडघशी पडले!
अगस्तीचा रणसंग्राम पुन्हा सुरू होणार

25 सप्टेंबर ला होणार मतदान

अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखा ना निवडणूक ऐन रंगात आली होती ,निवडणुकीची प्रचार सुरू होता राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांची अकोल्यात अभूतपूर्व प्रचाराची शेवटची सभा झाली प्रचाराची प्रचंड मोठी सभा झाली त्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणीअतिवृष्टीचे कारण देत सहकारातील राज्याच्या सर्व निवडणुका आहे त्या स्थितीत स्थगित करण्यात आल्याचा शासन आदेश सायंकाळी धडकला यामुळे दुसऱ्या दिवशी 17 जुलैला होणारी अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया थांबली

अतिवृष्टीचे कारण देत राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याचा आदेश दिला होता. यामुळे मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ही सर्व प्रक्रिया प्रशासनाने थांबवली व अवस्थेची निवडणूक स्थगित करण्यात आली अतिवृष्टीच्या कारणाने अचानक असा निर्णय घेतल्याने हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना तालुक्यात प्रचंड वेगाने पसरली यामुळे सहकारातील कार्यकर्त्यांमध्ये याचा प्रचंडअसंतोष निर्माण झाला परंतु शासकीय आदेश असल्याने या आदेशाचे विरोधात बोलण्यास कोणी तयार नव्हते मात्र अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर , आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील समृद्धी शेतकरी विकास मंडळाच्या वतीने शासनाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरविले आणि थेट औरंगाबाद हायकोर्ट गाठले व निर्णयाला आव्हान दिले दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेण्यात काही तारखा बदलत आज 30 ऑगस्टला या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली याचिकाकर्ते बाजूने अॅड. रमेश धोर्डे, अॅड. अजित काळे, ॲड. अनिकेत शरद चौधरी यांनी महत्वाची भुमिका पार पाडली

शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीने उमेदवार परबत नाईकवाडी , विकास शेटे, दिलीप मंडलिक यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या दोन्ही बाजूने यक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने स्थगित झालेले अगस्ती चे मतदान २५ सप्टेंबर २२ रोजी घेऊन . २६ सप्टेंबर२२ ला मतमोजणी चे आदेश दिले आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि आमदार डॉ. किरण लहामटे, कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळ यामध्ये सरळ दुरंगी सरळ लढत होत आहे यामुळे . काही काळ थांबलेला निवडणुकीचा रणसंग्राम पुन्हा सुरू होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button