श्री.ढोकेश्वर पाणीवापर संस्थेच्या चेअरमन पदी श्री.बाळासाहेब झावरे यांची बिनविरोध निवड

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील श्री.ढोकेश्वर पाणीवापर संस्था ,टाकळी ढोकेश्वर या संस्थेच्या चेअरमन पदी सुजित झावरे पाटील यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.बाळासाहेब किसन झावरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली
निवडी बद्दल तालुक्याच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ हौसाबाई शिवाजी ठाणगे, ज्ञानदेव यशवंत वाळुंज, शिवाजी चीमा ठाणगे, कोंडीभाऊ ठकाजी वाळुंज, संदीप नामदेव वाळुंज, सीताबाई रामदास वाळुंज, सुदाम किसन साळुंके, आशा दिगंबर शेळके सर्व सदस्यांचे सत्कार करून सन्मान करण्यात आले.
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी बाळासाहेब झावरे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड केल्याबद्दल काकणेवाडी, तिखोल, टाकळी ढोकेश्वर मधील सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले. यावेळी अरुणराव ठाणगे, पोपटराव झावरे, सरपंच गीताराम वाळुंज, प्रदीप वाळुंज, भगवान वाळुंज, अर्जुन वाळुंज, मा.सरपंच किसन वाळुंज, संदीप वाळुंज, मा.सरपंच निवृत्ती वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, अंकुश वाळुंज, भास्कर वाळुंज सर, सूर्यभान वाळुंज, मधुकर झावरे, ह. भ. प. रघुनाथ वाळुंज, संतोष पवार, विष्णू वाळुंज, इंजि. बबन वाळुंज, सरपंच भाऊसाहेब सैद, चेअरमन नारायण झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, दिलिपराव पाटोळे , बाळासाहेब झावरे पाटील, गोपाळा बर्वे गुरुजी, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय बर्वे, शिवाजी बर्वे, लखन बाबा झावरे, भाऊसाहेब जगदाळे, सचिन साठे तसेच काकणेवाडी, तिखोल, टाकळी ढोकेश्र्वर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.