रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोले तालुका अध्यक्ष कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे यांची फेरनिवड .

अकोले प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोले तालुका अध्यक्ष म्हणून कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे यांची फेरनिवड करण्यात आली. तर सावळेराम गायकवाड व जयवंत आढाव कार्याध्यक्ष तर कमलेश कसबे यांनची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
अकोले तालुका रिपब्लिकन पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्याचे सचिव विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये पक्षाची तालुका कार्यकारिणी नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ राखत घोषणा करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे अकोले तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे कार्याध्यक्ष सावळेराम गायकवाड, जयवंत आढाव सरचिटणीस- कमलेश कसबे, उपाध्यक्ष- राजेंद्र आव्हाड, सचिन खरात, मच्छिंद्र भालेराव, मदन सदगिर, रामचंद्र तपासे, कैलास पराड, रमेश साबळे, रविंद्र देठे खजिनदार- जनार्दन सोनवणे, मुख्य संघटक किशोर शिंदे, रामनाथ चव्हाण, वसंत वाकचौरे, संघटक रावसाहेब मनोहर, गौतम घोसाळे, मारूती सोनवणे, रविंद्र पवार चिटणीस अरूण हरनामे, गुणरत्न साळवे, बाळासाहेब गायकवाड, शाम गायकवाड, संपत उघडे, संजय संगारे, बाळासाहेब पवार युवक अध्यक्ष शंकर संगारे, सरचिटणीस नितिन सोनवणे, कार्याध्यक्ष मिलिंद जगताप, उपाध्यक्ष शशिकांत सरोदे, राहुल पवार,योगेश खरात, चिटणीस गौतम साळवे, अक्षय पवार, राहुल चिकणे, अकोले शहर अध्यक्ष विशाल वैराट, सरचिटणीस रमेश वाकचौरे, अकोले विभाग अध्यक्ष अर्जुन संगारे, देवठाण विभाग प्रमुख संदिप शिंदे, समशेरपूर विभाग प्रमुख पप्पू पराड, राजूर विभाग प्रमुख दिपक पवार, कोतूळ विभाग प्रमुख सुधाकर संगारे, ब्राम्हणवाडा विभाग प्रमुख वाल्मिक सोनवणे, महिला आघाडी प्रमुख अश्विनीताई कसबे, ख्रिश्चन समाज आघाडी तालुकाध्यक्ष पास्टर बाळासाहेब वैराट, उपाध्यक्ष पास्टरआनंद पवार, सल्लागार पास्टर गिदोन कर्णिक, सहसल्लागार पास्टर गोरक्ष साबळे, खजिनदार ब्रदर सुनील कर्णिक, खजिनदार ब्रदर विमलेश बिंद आणि सेक्रेटरी म्हणून ब्रदर जय मोहिते ख्रिश्चन महिला आघाडी तालुका अध्यक्ष सिस्टर वृषालीताई पवार, सेक्रेटरी सिस्टर अर्चनाताई साळवे, उपाध्यक्ष सिस्टर मिनाक्षीताई वैराट ,खजिनदार सिस्टर रेखाताई कर्णिक, सल्लागार सिस्टर भारतीताई मोहिते यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश युवक कार्याध्यक्ष पदासाठी शांताराम संगारे, तर उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीवर चंद्रकांत सरोदे,राजेंद्र घायवट व नगर जिल्हा कार्यकारिणीसाठी रमेश शिरकांडे, वसंत उघडे, गौतम पवार, आणि प्रदिप आढाव यांच्या नावाचा ठराव एकमताने करण्यात आला.
या बैठकीत विजय वाकचौरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष खऱ्या अर्थाने ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन भक्कम उभा करण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन बुथ बांधणी करावी लागणार आहे. एक बुथ दहा कार्यकर्ते अशी बांधणी करावयाची आहे.तसेच अकोले तालुक्यात पक्षाचे दहा हजार सभासद नोंदणी करायची आहे. भविष्यात आपल्याला आदिवासी आघाडी आणि मुस्लिम आघाडी तसेच बहुजन आघाडी देखिल निर्माण करायची आहे. अकोले विधानसभा मतदार संघात पक्षाचे किमान चाळीस हजार मतदार बनवायचे आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांच्या सुख दुःखात सहभाग नोंदवा,सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य घटकाला मिळण्यास मदत व प्रमाणिक प्रयत्न करा. येत्या नोव्हेंबर महिन्यात ना.आठवले यांच्या उपस्थितीत किमान दहा हजार लोकांचा मेळावा बाजार तळावर घेणार आहोत.त्यासाठी नियोजन करा असे सांगितले.यावेळी निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले, राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई बोरुडे, विभागीय अध्यक्ष भिमराज बागुल, ख्रिश्चन समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक थोरात अभिनंदन केले.