अकोले आय.टी.आय.च्या १२ वी समकक्षता परीक्षेचा निकाल ८९ टक्के

अकोले प्रतिनिधी-
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची समकक्षता देण्यासंदर्भात कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता.त्या अनुषंगाने अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोले मधील विद्यार्थी १२ वी समकक्षेतेसाठी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च २०२३ परीक्षा अर्थात इयत्ता १२वी च्या परीक्षेला १८ विद्यार्थी बसलेले होते.१२ वी परीक्षेचा निकाल आज ( दि.२५ रोजी) ऑनलाईन जाहीर झाला आहे १८ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून संस्थेचा १२ वी चा निकाल ८९ टक्के लागला आहे.अशी माहिती संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याची गरज राहिली नाही. त्यांनी आय टी आय ट्रेडचे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्यास त्यांना १२ वी ची समकक्षता परीक्षा देता येते. म्हणजे एका बाजूला आय टी आय चे प्रशिक्षण घेऊन कमी वयात विद्यार्थी स्वतः च्या पायावर उभे राहू शकतात.तर दुसऱ्या बाजूला महाविद्यालयीन शिक्षण ही महाविद्यालयात न जाता १२ वी ची समकक्षता परीक्षा देऊन महाविद्यालयीन शिक्षण नंतर पूर्ण करू शकतात.या मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनातील दोन वर्षांची बचत होते.या शासन निर्णयामुळे १० वी नंतर अनेक विद्यार्थ्यांचा कल आय टी आय कडे वाढला आहे.या परीक्षेसाठी तोंडी परीक्षा व इंग्रजी, मराठी या दोन विषयांची लेखी परीक्षा द्यावी लागते.
या संधीचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आय टी आय ला प्रवेश घ्यावा व त्याच बरोबर महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करावे असे आवाहन प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
आय.टी .आय.च्या माध्यमातून १२वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजीमंत्री मधुकरराव पिचड, कायम विश्वस्त तथा मा.आ.वैभवराव पिचड,कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, विश्वस्त मधुकरराव सोनवणे,सुरेशराव कोते, संपतराव वैद्य संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत,स्था.व्य.समितीचे अध्यक्ष यशवंतराव आभाळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. डी. के.सहाणे,शरदराव देशमुख, सुधाकरराव आरोटे,श्रीमती कल्पनाताई सुरपुरीया, ऍड.आनंदराव नवले,रमेशराव जगताप,मच्छिंद्र धुमाळ,शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,गट निदेशक मच्छिंद्र गायकर, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.