इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०२/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ११ शके १९४४
दिनांक :- ०२/०९/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १३:५२,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २३:४७,
योग :- ऐंद्र समाप्ति १९:१५,
करण :- गरज समाप्ति २५:१३,
चंद्र राशि :- तुला,(१७:५६नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५६ ते १२:२९ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०२ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
श्री बलराम जयंती, सप्तमी श्राद्ध, सूर्यषष्ठी, कार्तिकेय दर्शनाने पापनाश, घबाड १३:५२ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ११ शके १९४४
दिनांक = ०२/०९/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
विनाकारण आक्रमकता दाखवू नका.  नवीन लिखाण वाचनाचे काम चालू करा. तुमच्यातील क्रियाशीलता वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण  कराल. मेहनत फळाला येईल.

वृषभ
बोलण्यात गोडवा ठेवाल. घरगुती जबाबदारी वाढू शकते. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबासाठी वेगळा वेळ काढावा. व्यावसायिक निर्णय फलद्रुप होताना दिसतील.

मिथुन
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरात आनंदी वातावरण असेल. बौद्धिक बाजू चमकेल. हातातील अधिकार ठामपणे बजावा. भाग्याची चांगली साथ मिळेल.

कर्क
दिवसाची सुरुवात छान होईल. जोडीदाराच्या सल्ल्यावर विचार करावा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन ओळखी मन प्रफुल्लित करतील. आळस दूर सारावा.

सिंह
आपले स्वत्व राखून वागाल. मुलांबरोबर चांगला वेळ जाईल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. वेळेचा सदुपयोग करा.

कन्या
बोलण्याने लोकसंग्रह जमवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत.

तूळ
दिवसाची सुरुवात उत्साहात करा. छोटे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तुमच्या कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरातील ज्येष्ठांची संवादात्मक चर्चा करावी.

वृश्चिक
बोलतांना शांत व विचारपूर्वक बोला. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवा. आर्थिक व्यवहार सर्व बाबी तपासून करावेत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

धनू
जुन्या विचारांना थारा देऊ नका. बोलण्यात गुप्तता पाळावी. आक्रमक किंवा कटू शब्द टाळा. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा.

मकर
कामातून समाधान लाभेल. तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकार्‍यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. जुने वाद मिटण्याची शक्यता.

कुंभ
उतावीळपणे वागू नका. हातातील कामे यशस्वी होतील. जुगारातून धनलाभ संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. संशोधन पुढे नेण्यास उत्तम काळ.

मीन
बोलण्याचा आवेश इतर कामांसाठी वापरा. लोक तुमचा सल्ला मागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराचे व्यावहारिक चातुर्य दिसेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button